ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भारतीय जनता पार्टी महिला आघाडी तर्फे तुकूम मध्ये भव्य रक्तदान व जनसेवा उपक्रम 57 रक्तदात्यांचे योगदान

तसेच  SIR जनजागृतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :- मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्य चंद्रपूर महानगर भाजप द्वारा ५६ रक्तदान शिबिर करण्याचा संकल्प सुरू असलेल्या देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताह अंतर्गत तुकूम येथील चैतन्य जेष्ठ नागरिक सभागृह  तुकूम  परिसरात भव्य रक्तदान शिबिर, तसेच SIR मतदान यादी पूनरनिरीक्षण जनजागृती अभियान उत्साहात पार पडले. जनहिताच्या या उपक्रमांना नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला.

 सकाळी ८.०० ते सायंकाळी ५.०० या कालावधीत आयोजित रक्तदान शिबिरात ५७ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. तसेच SIR मतदान यादी पुनरनिरीक्षणाबाबत नागरिकांना मार्गदर्शन करून मतदान यादीतील नावांची पडताळणी व आवश्यक दुरुस्ती करण्याचे आवाहन करण्यात आले.

 या उपक्रमाला आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांनी सदिच्छा भेट देऊन रक्तदात्यांचे कौतुक केले. त्यांच्या हस्ते रक्तदात्यांना टिफिन व प्रमाणपत्र भेट देऊन गौरविण्यात आले. यावेळी त्यांनी रक्तदान हे सर्वोच्च समाजसेवेचे कार्य असून प्रत्येक रक्तदात्यामुळे अनेकांना जीवनदान मिळते. अशा समाजोपयोगी उपक्रमांमुळे सामाजिक बांधिलकी अधिक दृढ होत असून भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन व्हावे, असे मत व्यक्त केले

भाजपचे माजी जिल्हाध्यक्षतथा नगरसेवक तुकूम प्रभाग १, इंजि. सुभाष कासनगोट्टूवार यांच्या मार्गदर्शनाखाली  सौ. मंजुश्री सुभाष कासनगोट्टूवार आणि सौ वर्षाताई चिडे यांचा तुकूम महिला भजन मंडळ व महालक्ष्मि भजन मंडळ  आयोजित या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, स्वयंसेवक तसेच तुकूम परिसरातील नागरिकांनी विशेष परिश्रम घेतले. या जनसेवा उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून नागरिकांकडून आयोजकांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये