ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

निरोगी विद्यार्थीच उत्तम शिक्षण घेऊ शकतो आणि उज्वल भविष्य घडवू शकतो निलिमा सारडा.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी अशोक डोईफोडे

जायंटस ग्रूप ऑफ csn elite च्या वतीने खोकडपुर्यातील शिवाजी मोफत शिक्षण संस्था येथिल विध्यार्थी करिता शुद्ध पिण्याचे पाण्यासाठी 1 नविन युनिट सप्रेम भेट देण्यात आले यावेळी ग्रूप च्या सचिव निलिमा सारडा यांनी सांगीतले की निरोगी विद्यार्थीच उत्तम शिक्षण घेऊ शकतो आणि उज्वल भविष्य घडवू शकतो
आजचा दिवस आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा आहे. Giants Group of CSN Elite संभाजी नगर तर्फे शिवाजी हायस्कूलमध्ये शुद्ध आणि थंड पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने वॉटर कूलर भेट देण्यात आले

या सुंदर प्रकल्पासाठी उदार प्रायोजक __सौ किरण अशोक अग्रवाल
सौ प्रतिभा अभिलाष अग्रवाल,
सौ मीना सतीश पसारी
सो कुसुमदेवी सत्यनारायण जी बगड़िया यांचे . त्यांच्या सामाजिक बांधिलकीमुळेच हा उपक्रम आज साकार झाला आहे.

आमचा ठाम विश्वास आहे की स्वच्छ पिण्याचे पाणी हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत हक्क आहे. निरोगी विद्यार्थीच उत्तम शिक्षण घेऊ शकतो आणि उज्ज्वल भविष्य घडवू शकतो. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे म्हणजे देशाच्या भविष्यात गुंतवणूक करणे होय.

आजचा हा वॉटर कूलर प्रकल्प ही केवळ एका प्रवासाची सुरुवात आहे. Giants Group of CSN Elite ने शिवाजी हायस्कूल दत्तक घेण्याचा संकल्प केला आहे. येणाऱ्या काळात या शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबविणार आहोत.

यामध्ये शाळेत डस्टबिन उपलब्ध करून देणे, वृक्षारोपण करणे, स्वच्छ व सुसज्ज स्वच्छतागृह (वॉशरूम) उभारण्यासाठी सहकार्य करणे, तसेच विद्यार्थ्यांसाठी शालेय गणवेश वाटप, प्रेरणादायी व्याख्याने, योग, ध्यान, व्यक्तिमत्त्व विकास, आरोग्य जनजागृती आणि इतर अनेक उपयुक्त उपक्रम नियमितपणे आयोजित करण्याचा आमचा मानस आहे.

आमचे उद्दिष्ट केवळ सुविधा उपलब्ध करून देणे नाही, तर विद्यार्थ्यांना निरोगी, सुसंस्कृत, आत्मविश्वासू आणि जबाबदार नागरिक बनविण्यासाठी शाळेसोबत खांद्याला खांदा लावून कार्य करणे हे आहे.

शाळा व्यवस्थापन, शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांनीही या सुविधांचा जपून वापर करावा, समाज आणि शाळा यांच्या सहकार्याने आपण निश्चितच एक आदर्श शैक्षणिक वातावरण निर्माण करू शकतो.
यावेळी स्पेशल कमिटी मेंबर विनोद शेवतेकर, श्रीमती सूर्यमाला मालानी, फेडरेशन अध्यक्ष जुगलकिशोर हरकुट, फेडरेशन चे माजी अध्यक्ष अमित मालानी,ग्रूप च्या अध्यक्षा चंचल मालानी, पल्लवी बलदवा, लता असावा, मोनालिसा जैन, सोनल जेथलिया, रश्मी करवा,शाळेचे प्राचार्य जी.के. आढाव, शरद दवणे, देऊळगाव राजा नपचे बांधकाम समिती सभापती विष्णू झोरे, देऊळगाव राजा ग्रुपचे माजी अध्यक्ष अरुण कायस्थ उपस्थित होते. सूत्र संचलन डॉ. संदीप तुपे यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये