ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जीवनधारा उपक्रमाअंतर्गत डायलेसीस महिला रुग्णाला आर्थीक मदत

इनरव्हील क्लब भद्रावती ब्लोसमचा उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

           इनरव्हील क्लब भद्रावती ब्लोसमच्या च्या वतीने जीवनधारा या सेवाभावी उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे.या उपक्रमाअंतर्गत इनरव्हील क्लब भद्रावती ब्लोसम च्या वतीने शहरातील एका डायलेसीस महिला रुग्णाला आर्थीक मदत करण्यात आली आहे.

यावेळी क्लबच्या अध्यक्षा वर्षा धानोरकर यांच्या नेतृत्वात क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी सदर महिला रुग्णाची भेट घेऊन त्यांच्या आजाराविषयी विचारपुस केली.इनरव्हील क्लब हा सामाजिक सेवेत नेहमीच अग्रेसर असतो. इनरव्हील क्लब तर्फे जीवनधारा हा सेवाभावी उपक्रम सुरु करण्यात आला असुन या उपक्रमाचा फायदा आर्थिक दृष्टीने कमकुवत असलेल्या रुग्णांना होईल असा विश्वास इनरव्हील क्लब भद्रावती ब्लोसमच्या अध्यक्षा वर्षा धानोरकर यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी क्लबच्या अध्यक्षा वर्षा धानोरकर, सचीव स्वाती चारी,कोषाध्यक्ष स्वरुपा पाटील, ऊपाध्यक्षा तृप्ती हिरादेवे,शुभांगी बोरकुटे,प्रियंका कुंभारे,प्रियंका नागपूरे,मनीषा फुले, मनीषा ऊचाडे,प्रतीभा मानकर,नाजुका नांदेकर,मंगला धुळे,शारदा भोतमांगे आदी उपस्थीत होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये