ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाच्या १२ वर्षांनिमित्त भाजपा पोंभूर्णा तालुक्याचा स्वच्छता अभियान उत्साहात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर

पोंभूर्णा : मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी, पोंभूर्णा तालुक्याच्या वतीने स्वच्छता अभियान उत्साहात राबविण्यात आले.

या अभियानात भाजपा पदाधिकारी, महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या तसेच कार्यकर्त्यांनी सार्वजनिक ठिकाणे, परिसर आणि महत्त्वाच्या स्थळांची स्वच्छता करून स्वच्छ भारत अभियानाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविला. स्वच्छता ही केवळ एक मोहीम नसून प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष हरीश ढवस यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून देशभरात स्वच्छतेबाबत व्यापक जनजागृती झाली असून स्वच्छ, सुंदर आणि विकसित भारत घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे.

लोकनेते आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाध्यक्ष हरीशभैय्या शर्मा यांच्या नेतृत्वात पोंभूर्णा तालुक्यात विविध सेवा व जनहिताचे उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हे स्वच्छता अभियान उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

या उपक्रमात भाजपा पदाधिकारी, महिला मोर्चा पदाधिकारी तसेच अनेक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून स्वच्छतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये