ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल, वनसडीचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

वनसडी येथे नव्याने सुरू होत असलेल्या ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूलचा भव्य उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम दिनांक 30 जून 2026 रोज मंगळवारला मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे उदघाटक वनसडी गावातील ग्रामपंचायत सरपंच सौ. मंगलाताई आत्राम तसेच सदस्य श्री राजाभाऊ गलगट, श्री भास्कर जोगी तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री उद्धवकुमार तडस व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व फीत कापून शाळेचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री सुधाकर ताजने तसेच मान्यवर, पालक, ग्रामस्थ तसेच शिक्षणप्रेमी श्री राजेश राठोड, श्री निवृत्ती पिंगे, श्री अमर विंचू, श्री साईनाथ पोटवडे, ध्रुव मालेकर तसेच या शाळेचे शिक्षिका सौ. मनिषा येमूलवार, सौ. सपना ताजणे तसेच काळजीवाहक श्रीमती नंदा करिये तसेच संस्थेचे सदस्य सौ. नंदा तडस, सौ. छब्बुताई जगनाडे, श्री नितीन जगनाडे तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून दर्जेदार शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत शाळेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

शाळेत आधुनिक शिक्षणपद्धती, प्रशिक्षित शिक्षकवृंद, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षल तडस यांनी प्रभावीपणे पार पाडले, तर शेवटी उपस्थित मान्यवर, पालक व ग्रामस्थांचे आभार सौ सपना ताजने यांनी मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. उद्घाटन सोहळ्यामुळे परिसरात आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये