ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हातात हात घेऊन विद्यार्थ्यांचे स्वागत; घाटकुळच्या प्रवेशोत्सवाने जिंकली सर्वांची मने

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर

महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, घाटकुळ येथे मंगळवारी शाळा प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांचे कपाळी टिळक लावून, पुष्पगुच्छ देऊन तसेच हातात हात घेऊन वर्गात नेऊन करण्यात आलेल्या आत्मीय स्वागताने उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती पोंभुर्णाचे गटशिक्षणाधिकारी मा. श्री. आवारी साहेब आणि विस्तार अधिकारी मा. तामगाडगे सर उपस्थित होते. यावेळी विषय तज्ज्ञ श्री. प्रवीण गणवीर, श्री. आंधळे सर, श्री. गुडेपवार सर, श्री. युवराजजी झाडे, श्री. साईनाथजी मेदाडे, ग्रामपंचायत घाटकुळचे सचिव श्री. अकनूरवार, सौ. रिया धोटे, सौ. प्रीतीताई मेदाडे, सौ. अल्काताई पाल, सौ. तेलसे मॅडम, कु. जंगले मॅडम तसेच पालक प्रतिनिधी मोहन भाऊ चुदरी, नीलकंठ मेदाडे, चरणदास गोहणे आणि अनेक माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थी व पालकांचे पारंपरिक पद्धतीने टिळक लावून स्वागत करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना आनंदी वातावरणात वर्गात नेऊन त्यांच्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात करण्यात आली. इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा उत्साह वाढविण्यात आला.

शाळेचे मुख्याध्यापक निमसरकार सर, शिक्षक राजेंद्र खोब्रागडे सर, किशोरकुमार ठाकरे सर, रामकृष्ण चनकापुरे सर, विठ्ठल राजूरकर सर, अरुण मेदाडे सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, पालकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि शाळेने दिलेले आत्मीय स्वागत यामुळे हा प्रवेशोत्सव परिसरात कौतुकाचा विषय ठरला. शिक्षणाबद्दल सकारात्मक संदेश देणारा हा उपक्रम सर्व स्तरांतून आदर्शवत असल्याच्या भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये