ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कायदेशीर स्पष्टता मिळेपर्यंत ई-पीक पाहणीचे काम पोलीस पाटलांकडून घेऊ नये

गाव कामगार पोलीस पाटील संघाचे तहसीलदारांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

समुद्रपूर : ई-पीक पाहणी व पीक नोंदणीच्या कामाबाबत कायदेशीर स्पष्टता, जबाबदारीची निश्चिती, विमा संरक्षण, अपघात भरपाई आणि योग्य मोबदल्याची तरतूद करण्यात यावी. तसेच शासनाकडून स्पष्ट आदेश प्राप्त होईपर्यंत पोलीस पाटलांकडून हे काम करून घेऊ नये, अशी मागणी गाव कामगार पोलीस पाटील संघ, जिल्हा वर्धा यांच्या वतीने तहसीलदार समुद्रपूर यांच्याकडे करण्यात आली.

संघटनेने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, महाराष्ट्र ग्रामपोलीस अधिनियम १९६७ मध्ये ई-पीक पाहणी अथवा पीक नोंदणी हे पोलीस पाटील यांचे वैधानिक कर्तव्य म्हणून नमूद नाही. तरीही मागील दोन वर्षांपासून पोलीस पाटील महसूल प्रशासनास सहकार्याच्या भूमिकेतून हे काम करीत आहेत.

ई-पीक पाहणीसाठी शेतशिवारात जावे लागत असल्याने सर्पदंश, विंचूदंश, रस्ते अपघात, विजेचा धक्का, उष्माघात यांसारख्या विविध जोखमींचा सामना करावा लागतो. मात्र या कामासाठी कोणतेही विमा संरक्षण, जोखीम भत्ता किंवा विशेष सुरक्षा सुविधा उपलब्ध नसल्याची बाब संघटनेने निदर्शनास आणून दिली आहे.

तसेच पोलीस पाटील स्वतःचा मोबाईल, इंटरनेट व प्रवास खर्च वापरून काम करीत असूनही त्यांना कोणतेही स्वतंत्र मानधन अथवा भत्ता देण्यात आलेला नाही. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून केलेल्या कामाचा योग्य मोबदला मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

ई-पीक पाहणीतील त्रुटी अथवा अपूर्ण नोंदींसाठी पोलीस पाटील यांना जबाबदार धरू नये, त्यांच्या भूमिकेबाबत स्पष्ट आदेश निर्गमित करावेत तसेच आवश्यक संरक्षण उपलब्ध करून द्यावे, अन्यथा सदर काम महसूल यंत्रणेमार्फतच करण्यात यावे, अशी भूमिका संघटनेने निवेदनाद्वारे मांडली आहे.

                  यावेळी त्र्यंबक गोहने, जिल्हा कार्यकारी अध्यक्ष

 जयंत वाकडे, जिल्हा उपाध्यक्ष

 कुंदन सिंग छोयले, तालुका अध्यक्ष

 राजू दांडेकर , तालुका सचिव

 गणेश धोटे, जिल्हा समन्वयक

 सचिन महाकाळे, जिल्हा समन्वयक

गोपाल किरपाल, गणेश तडस

 प्रदीप शंभरकर , चंद्रकांत बहादुरे

 शारदा घाडगे, अर्चना कुबडे

 स्मिता वांदिले, अविनाश घोरपडे

 आशिष पाटील, भगवान चापले

 किशोर राऊत, वैशाली बुरडकर

 अंकुश धोटे, कवडू सोमलकर

 अफरोज सय्यद, पंकज चौधरी

 गणेश तडस, कुणाल यलगुंडे

 शंकर वैद्य, किशोर राऊत

 प्रकाश भगत, निखिल उईक

 कामिका ठवरी, शरद बारई असे सर्व पोलीस पाटील संघटनेचे पोलीस पाटील उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये