ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कवठा झोपडी येथे सुदाम घरडे यांच्या अंगावर वीज पडून दुर्दैवी मृत्यू

घरडे कुटुंबावर दुःखांचा डोंगर कोसळला

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दि. 28 जून 2026 रोजी सायंकाळी 4.00 वाजताच्या सुमारास देवळी तालुक्यातील कवठा झोपडी सुदाम वामन घरडे (वय 58 वर्षे) यांच्या अंगावर वीज पडून त्यांच्या दुर्दैवी मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, सुदाम घरडे हे शेत परिसरात असताना अचानक पावसासह जोरदार वादळी वातावरण निर्माण झाले. त्यावेळी त्यांच्या अंगावर वीज कोसळल्याने ते गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी तातडीने मदतीचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.या घटनेमुळे कवठा झोपडी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, घरडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील कार्यवाही सुरू आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये