पोंभुर्णा तालुक्यात पल्स पोलिओ मोहीमेची जय्यत तयारी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
दि.२८/६/२०२६ (रविवार) ला होणा-या पल्स पोलिओ लसीकरण अभियानाची पोंभुर्णा तालुक्यात जय्यत तयारी केलेली असुन तालुक्यातील ४९१९८ लोकसंख्येमधुन (० ते ५ वर्षे वयोगटील)२२४६ पात्र लाभार्थ्यांना पोलीओ डोस देण्यात येणार आहे. त्याकरीता ६८ बुथ, २ मोबाईल टिम, १८ ट्रान्झिट टिम, तसेच १३९ पेक्षा जास्त मनुष्यबळ उपलब्ध ठेवण्यात आलेले आहे.
करीता आपापल्या गावातील (० ते ५वर्षे वयोगटातील)एकही पात्र लाभार्थी पोलीओ डोस पासून वंचित राहणार नाही त्या अनुषंगाने लाभार्थी पालक, गावातील लोकनेते, युवक मंडळे, महिला मंडळे,शासकिय कर्मचारी ई.नी सहकार्य करुन सर्वं पात्र लाभार्थ्यांना डोस मिळेल यांबाबत जागरूकता निर्माण करुन आपला गाव पोलीओ मुक करण्याचे आवाहन डॉ. वंदना खंडाळकर, तालुका आरोग्य अधिकारी, तालुका पोंभुर्णा. यांनी केलेले आहे.



