ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपुरातील वस्तू व सेवा कर भवनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरदृश्यप्रणालीद्वारे करणार १८ जूनला लोकार्पण

आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून साकारले २९.९९ कोटींचे अत्याधुनिक भवन

चांदा ब्लास्ट

चंद्रपूरच्या प्रशासकीय विकासात आणखी एक मैलाचा दगड; आ. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांतून उभे राहिले जीएसटी भवन

आ. मुनगंटीवार यांच्या दूरदृष्टीतून साकारले जीएसटी भवन लोकार्पणास राज्यमंत्री आशिष जयस्वाल प्रत्यक्ष राहणार उपस्थित

चंद्रपूर :_ शहराच्या प्रशासकीय सुविधांमध्ये महत्त्वाची भर घालणाऱ्या वस्तू व सेवा कर (GST) भवनाचे लोकार्पण येत्या १८ जून रोजी सकाळी ११ वाजता संपन्न होणार असून, या प्रकल्पामागे माजी वित्तमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेल्या पुढाकाराची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे दूरदृश्यप्रणालीद्वारे या अत्याधुनिक भवनाचे लोकार्पण करणार आहेत. तसेच वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिषजी जयस्वाल हे प्रत्यक्ष उपस्थित राहणार असून, चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकजी उईके हेही दूरदृश्यप्रणालीद्वारे कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रशासकीय विकासात महत्त्वाची भर घालणारे स्वतंत्र व अत्याधुनिक वस्तू व सेवा कर (जीएसटी) भवन साकारण्यात आमदार सुधीर मुनगंटीवार यांची दूरदृष्टी आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा निर्णायक ठरला आहे. वित्तमंत्री म्हणून कार्यरत असताना त्यांनी चंद्रपूरमध्ये स्वतंत्र व सुसज्ज जीएसटी भवन उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या पुढाकारामुळे १५ मे २०१७ रोजी या प्रकल्पासाठी २१ कोटी ४३ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता मंजूर करण्यात आली. त्यानंतर इमारत बांधकामाच्या दरसूचित झालेल्या वाढीमुळे २४ जानेवारी २०२४ रोजी २९ कोटी ९९ लाख ८० हजार रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. आ.मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे साकारलेले हे अत्याधुनिक भवन आता लोकार्पणासाठी सज्ज झाले आहे.

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या दूरदृष्टीतून आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून साकारलेल्या या अत्याधुनिक जीएसटी भवनामुळे वस्तू व सेवा कर विभागाच्या कामकाजाला अधिक गती मिळणार आहे. करदाते, व्यापारी आणि उद्योजकांना एकाच ठिकाणी आधुनिक व सुसज्ज सुविधा उपलब्ध होणार असून नागरिकाभिमुख प्रशासनाच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. चंद्रपूरच्या प्रशासकीय विकासात मोलाची भर घालणारा हा प्रकल्प आ. मुनगंटीवार यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाचा आणखी एक ठसा उमटविणारा ठरणार असून, या भवनाच्या लोकार्पणामुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला नवी चालना मिळणार आहे.

आधुनिक सुविधांनी सुसज्ज जीएसटी भवन

जलनगर वॉर्ड परिसरात उभारण्यात आलेले हे चार मजली (G+3) अत्याधुनिक भवन सुमारे ५४०७ चौरस मीटर क्षेत्रफळामध्ये बांधकाम असून, करदाते, व्यापारी, उद्योजक आणि विभागीय अधिकाऱ्यांसाठी सर्व आधुनिक सुविधा येथे उपलब्ध करण्यात आल्या आहेत. भवनात प्रशासकीय कार्यालये, प्रशिक्षण सभागृह, परिषद कक्ष, वातानुकूलित सुविधा, लिफ्ट, पार्किंग, अग्निसुरक्षा यंत्रणा तसेच नागरिकाभिमुख सेवा सुविधा उभारण्यात आल्या आहेत.

आ.मुनगंटीवार यांनी केली लोकार्पणपूर्व जीएसटी भवनाची पाहणी

१८ जून रोजी होणाऱ्या लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतीच चंद्रपूर येथील नव्याने उभारण्यात आलेल्या वस्तू व सेवा कर (जीएसटी) भवनाची पाहणी केली. यावेळी त्यांनी इमारतीतील विविध सुविधा, उर्वरित कामे तसेच आढळलेल्या त्रुटींचा सविस्तर आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. लोकार्पणापूर्वी सर्व कामे गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करून नागरिकांना अत्याधुनिक व सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देण्यावर त्यांनी विशेष भर दिला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये