ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार : आरोपी अटकेत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

      लग्नाचे आमिष दाखवून २२ वर्षीय युवतीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी भद्रावती पोलिसांनी एका युवकाला अटक केली आहे. नीरज रामदास कुमरे (वय ३५, रा. खापरी, नागपूर) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित युवती व आरोपी हे नातेवाईक असून त्यांची ओळख २०२४ पासून होती. आरोपीने पीडितेला लग्नाचे आश्वासन देत भद्रावती येथील एका हॉटेलमध्ये बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे.

घटनेनंतर पीडितेने आपल्यासोबत घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर शुक्रवारी (दि. १२) भद्रावती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली.

या प्रकरणाचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत असून, तपासाअंती आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये