धनोजे कुणबी मध्यवर्ती समितीच्या अध्यक्षपदी ढवस तर सचिवपदी राजूरकर यांची निवड
जवळपास 25 मंडळ या समितीशी संलग्न

चांदा ब्लास्ट
धनोजे कुणबी मध्यवर्ती समितीच्या अध्यक्ष पदी संजय ढवस तर सचिवपदी पवन राजूरकर यांची निवड धनोजे कुणबी समाजाच्या मध्यवर्ती समितीची निवडणूक नुकतीच धनोजे कुणबी समाज मंदिर चंद्रपूर येथे पार पडली असून सर्व धनोजे कुणबी समाज मंडळ या समितीशी संलग्न असून जवळपास 25 मंडळ या समितीशी संलग्न आहे. पार पडलेल्या सभेत समाज उपयोगी विविध कार्यक्रमांची व समाज बांधनीची रूपरेषा आखण्यात आली.
सोबतच जुन्या कार्यकारणीचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने नव्याने कार्यकारणीचा स्थापना करण्यात आली या मध्ये अध्यक्ष म्हणून चंद्रपूर समाज मंडळाचे उपाध्यक्ष संजय ढवस तर सचिव म्हणून गडचांदूर समाज मंडळाचे अध्यक्ष पवन राजूरकर यांची निवड करण्यात आली त्याच बरोबर मार्गदर्शक म्हणून ऍड. पुरुषोत्तमजी सातपुते तर सल्लागार म्हणून श्रीधरराव मालेकर, चंद्रपूर, मनोहरराव पाऊणकर, चंद्रपूर व दौलतराव भोंगळे, राजुरा यांची निवड करण्यात आली.
त्याच बरोबर कोषध्यक्ष म्हणून अनिल धानोरकर, भद्रावती व उपाध्यक्ष म्हणून मधुकरराव ढोके, नागपूर. पांडुरंगजी टोंगे, भद्रावती, ऍड. संतोष कुचणकर, यवतमाळ, रामकृष्णजी ताजने, गडचिरोली यांची निवड करण्यात आली तर सहसचिव म्हणून संजय महाजन, पांढरकवडा. श्रीधरराव फटाले, बल्हारशा. मुकुंदराव लोडे, बुटीबोरी. ऍड. प्रफुलजी आस्वले, गोंडपिपरी यांची निवड करण्यात आली.
तर महिला प्रतिनिधी म्हणून मनीषाताई बोबडे, चंद्रपूर, मनीषाताई नागपुरे मार्डी यांची निवड करण्यात आली तर कार्यकारणी सदस्य म्हणून ऍड. गजाननराव बोढाले, वरोरा. किशोर निबुदे, घाटंजी.मंगेश रासेकर, वणी, राहुल ठाकरे, यवतमाळ, सुनील देरकर, कोरपणा युवराज वासाडे, सौन्सर,राहुल ठाकरे, यवतमाळ,केशवराव जीवतोडे, विरूर स्टेशन, राजू घुगल,सावनेर यांची निवड करण्यात आली त्याच प्रमाणे सर्व मंडळाचे अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष किंवा त्यांनी निर्देशीत केलेले पदाधिकारी हे पदसिद्ध सदस्य राहतील असे सर्वानुमते ठरविण्यात आले



