ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

यशवंत विद्यालय हिंगणी, येथे रोटरी क्लब होरायझन नागपूर तर्फे सायकल वाटप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

        यशवंत विद्यालय हिंगणी, येथे आज दि.14/6/2026 ला . रोटरी क्लब होरायझन नागपूर तर्फे सायकल वाटप करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. नंदकिशोर ठाकरे सर तसेच प्रमुख अतिथि रोटरी क्लब चे अध्यक्ष डॉ. मुंगळकर, सचिव डॉ. मृणाली बल्लाळ तसेच क्लब चे सदस्य डॉ. बल्लाळ सर तसेच शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष श्री. पृथ्वीराज बावणे वहिंगणी सर्कल चे प्रमुख मनोज वाघमारे कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गिय दाआजी उपाख्य बापुरावजी देशमुख व माता सरस्वती यांच्या फोटोचे पूजन केले.

रोटरी क्लब चे अध्यक्ष डॉ . मुंगळकर सर यांनी आम्ही ज्या सायकल वाटप करतो यांचा मुख्य उद्देश असा आहे की ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत जाणे व येणे लवकर व्हावे हा उद्देश ठेवून क्लबच्या वतीने दरवर्षी सायकल वाटप करत असतो असे त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले. तसेच क्लबच्या सचिव सौ. शिल्पा धर्माधिकारी मॅडम यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, आम्ही ज्या सायकल वाटप करतो त्या किमान 5 वर्षे व्यवस्थित वापर करा व चांगले शिक्षण घेवून शाळेचे व गावाचे नाव उज्वल करा असे सांगितले . तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री. ठाकरे सर यांनी आपल्या मनोगतातून रोटरी क्लब होरायझन यांनी सामाजिक बांधिलकी जोपासून ग्रामिण भागातील वर्ग ५ ते १० च्या विद्यार्थ्यांना 20 सायकल दिल्या आहे तेव्हा आमच्या शाळेतील विद्यार्थी यांना शाळेत येतांना जो आनंद होईल तेव्हा ते आपले उपकार कधीही विसरणार नाही. शाळेत येतांना त्यांचा जो वेळ वाचेल तो अभ्यासात घालवेल . व मी शाळेच्या वतीने रोटरी क्लब होरायझन नागपूर चे मनोपूर्वक आभार मानतो असे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले .

     या कार्यक्रमाला वर्ग ५ ते १० चे लाभार्थी विद्यार्थी व पालक तसेच गावातील मान्यवर व्यक्ती तसेचे शाळेचे ग्रंथपाल श्री.अशोक काळे,क्लर्क श्री बोनी देवढे,श्री.सतिश तेलरांधे व देवेंद्र वैद्य हजर होते.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. नरेंद्र ढवळे सर यांनी केले व आभार प्रदर्शन जेष्ठ शिक्षक श्री. अनिल लोहकरे सर यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये