ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सेलू शहरातील रस्ते खोदकामामुळे नागरिक त्रस्त

वाहतूक विस्कळीत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

सेलू नगर पंचायतच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत भूमिगत पाईपलाईन टाकण्याचे काम सध्या शहरात सुरू आहे. या कामासाठी मुख्य सिमेंट रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले असून त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

बोरधरण येथून शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी भूमिगत पाईपलाईन टाकली जात आहे. मात्र कामादरम्यान रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना एकाच वेळी खोदकाम केल्याने वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली आहे. खोदकामातून निघालेली माती रस्त्याच्या मध्यभागी टाकण्यात आल्याने अनेक मार्ग वाहतुकीसाठी जवळपास बंद झाले आहेत.

मेडिकल चौक ते श्रीक्षेत्र घोराड हा शहरातील महत्त्वाचा मार्ग असून या रस्त्यावरून दररोज मोठ्या प्रमाणात नागरिक, विद्यार्थी आणि भाविकांची ये-जा असते. रस्त्यावर पडलेले मातीचे ढिगारे, सुरू असलेले खोदकाम आणि वाहतुकीवरील निर्बंध यामुळे नागरिकांची गैरसोय वाढली आहे.

स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर नियोजनाच्या अभावाचा आरोप केला असून, कामाचे योग्य व्यवस्थापन करून रस्ते तातडीने पूर्ववत करावेत आणि वाहतुकीसाठी खुले करावेत, अशी मागणी केली आहे. विकासकामे आवश्यक असली तरी नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा कमी परिणाम होईल, याची काळजी घेण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये