ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्कॉर्पिअन्ज डान्स अकॅडमीच्या उन्हाळी शिबीराचा समारोप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         स्कॉर्पिअन्ज डान्स अकॅडमी, भद्रावती तर्फे आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या उन्हाळी प्रशिक्षण कार्यशाळेचा उत्साहपूर्ण वातावरणात दिमाखदार समारोप करण्यात आला. यावर्षीच्या शिबिराला शहरातील विद्यार्थी व पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून ५ ते १८ वर्षे वयोगटातील ३५ विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेतला.

शिबिरामध्ये नृत्य, चित्रकला, स्केटिंग, हस्तकला, मॉडेलिंग, ब्रेन स्पर्धा, इनडोअर गेम्स तसेच एकदिवसीय वॉटर पार्क टूर यांसारख्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या सर्व उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभाग नोंदवून आपले कलागुण सादर केले. कार्यशाळेत चित्रकला प्रशिक्षक शुभम रॉय, स्केटिंग प्रशिक्षक कोमल वाकडे तसेच आर्ट अॅण्ड क्राफ्ट प्रशिक्षक प्रिया मामीडवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

समारोपाच्या दिवशी ग्रँड फिनाले अंतर्गत डान्स, मॉडेलिंग व सिंगिंग स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. दोन गटांमधील डान्स स्पर्धेत मैत्री पाझारे व आलिया बनसोड विजेत्या ठरल्या. मॉडेलिंग स्पर्धेत दोन गटांमध्ये मैत्री पाझारे व मीरा गुप्ता आणि मुलांच्या गटात अद्विक पाझारे यांने प्रथम क्रमांक पटकावला. सिंगिंग स्पर्धेत मीरा गुप्ता हिने विजेतेपद मिळविले. या स्पर्धांचे परीक्षक म्हणून नफीज अहमद व रोहिणी सोलंकी यांनी काम पाहिले. तसेच लावणी सम्राज्ञी व अभिनेत्री ज्योती रामावार तसेच डान्स इंडिया डान्स फेम गुंजन फुलझेले व गोजिरी फुलझेले यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.

शिबिराचे प्रमुख संयोजक सागर रामकृष्ण मामीडवार हे मागील तीन वर्षांपासून भद्रावती येथे उन्हाळी प्रशिक्षण शिबिर आयोजित करीत आहेत. त्यांच्या स्कॉर्पिअन्ज डान्स अकॅडमीद्वारे मुला-मुलींना हिप-हॉप, बॉलिवूड व फ्री-स्टाईल नृत्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यांनी गोवा व हैदराबाद येथे आयोजित राष्ट्रीय नृत्य स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकावून भद्रावतीचे नाव उज्ज्वल केले आहे. समारोपानंतर सर्वांना अल्पोपहार देण्यात आला. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे तर विजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये