ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रियेसाठी वयोमर्यादा २ वरून ५ वर्षांपर्यंत वाढविण्याचा निर्णय

आमदार किशोर जोरगेवार यांच्या पाठपुराव्याला यश

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ कर्णबधिर बालकांना ऐकण्याची आणि बोलण्याची नवी संधी मिळवून देणाऱ्या कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रियेसंदर्भात आमदार किशोर जोरगेवार यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. राज्य शासनाने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत (RBSK) कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रियेसाठी लाभार्थी बालकांची वयोमर्यादा दोन वर्षांवरून पाच वर्षांपर्यंत वाढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

            चंद्रपूर जिल्ह्यासह राज्यभरात अनेक कर्णबधिर बालकांची कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया केवळ आर्थिक अडचणी आणि प्रशासकीय विलंबामुळे रखडली होती. या गंभीर विषयाची दखल घेत आमदार किशोर जोरगेवार यांनी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची मुंबई येथे भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले होते. निवेदनात कॉक्लिअर इम्प्लांटसाठी आवश्यक निधी वाढविणे, प्रलंबित प्रकरणांना तातडीने मंजुरी देणे आणि शस्त्रक्रियेसाठी असलेली वयोमर्यादा वाढविण्याची मागणी करण्यात आली होती.

            या मागणीची सकारात्मक दखल घेत राज्य शासनाने वयोमर्यादा वाढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे यापूर्वी वयोमर्यादेअभावी योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असलेल्या अनेक बालकांना आता उपचाराची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे राज्यातील शेकडो कुटुंबांना दिलासा मिळाला असून अधिकाधिक मुलांना ऐकण्याची आणि बोलण्याची क्षमता प्राप्त होण्यास मदत होणार आहे.

            आमदार किशोर जोरगेवार यांनी या निर्णयाचे स्वागत करताना सांगितले की, “कर्णबधिर बालकांचे भविष्य घडविण्यासाठी योग्य वेळी उपचार मिळणे अत्यंत आवश्यक आहे. शासनाने घेतलेला हा निर्णय अनेक कुटुंबांसाठी आशेचा किरण ठरणार आहे. पुढेही प्रलंबित शस्त्रक्रियांना मंजुरी आणि आर्थिक मदतीत वाढ करण्यासाठी पाठपुरावा सुरू राहील.

            या निर्णयामुळे चंद्रपूरसह राज्यातील अनेक बालकांना नवजीवन मिळणार असून, आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनहिताच्या प्रश्नांवरील प्रभावी पाठपुराव्याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये