गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पांढरकवडा पारधी बेडा व सिख बेडा सावंगी मेघे परीसरात वॉश आउट मोहीम

एकूण ३ लाख ९७ हजारावर मुद्देमाल नाश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

सविस्तर याप्रमाणे आहे की, नमुद घ.30/07/23 चे 11.38 वा वेळी व सदर स्थळी वॉष आउट मोहिम दरम्यान मुखबीरचे खात्रीषीर खबरेवरून यातील नमुद आरोपीवर पंच व पो. स्टाफसह प्रोरेड केला असता आरोपीस पोलीस आल्याची चाहूल लागताचा मोक्क्यावरुन पसार झाल्याने पंचासमक्ष घटनास्थळाची पाहणी केली असता मोक्क्यावरून आरोपीचे ताब्यातून 1) 12 लोखंडी ड्रममध्ये प्रती ड्रम 100 लि. प्रमाणे 1200 लि. कच्चा मोहा रसायन सडवा प्र. लि. 100 रू. प्रमाणे किं. 1,20,000/रू. 2) दोन लोखंडी ड्रममध्ये प्रती ड्रममध्ये 30 लि.प्रमाणे 60 लि. उकळता मोहा रसायन सडवा किं. 6000/रू. 3) 14 खाली लोखंडी ड्रम किं. 7000/-रू. 4) एका प्लास्टीक डबकीत अं. 28 लि. गावठी मोहा दारू डबकीसह किं. 3000/रू. 5) 2 जर्मनचे घमेले कि. 1000/रू 6) जळावू लाकडे, नेवारपट्टी व ईतर भट्टीचे साहीत्य किं. 500/रू. असा एकुण जु.किं. 1,37,500/रू. चा मुद्देमाल अवैधरित्या मिळून आल्याने सदरचा माल पंचासमक्ष मोक्का जप्ती पंचनामा कारवाई प्रमाणे जप्त करून नमुद आरोपी 1) कालुसिंग भादा रा सिखबेडा, सावंगी मे ता.जि. वर्धा विरूध्द सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

तसेच अप.क्र. 427/23 कलम 65 (F) , 83 मदाका
आरोपी – 1) इंद्रपाल राजु भोसले वय 44 वर्ष 2) अर्चना इंद्रपाल भोसले वय 38 वर्ष रा पारधी बेडा पांढरकवडा मिळाला माल 16 प्लॅस्टिक ड्रममध्ये अंदाजे 100 लीटर प्रमाणे 1600 लीटर कच्चा मोहा सडवा प्रत्येकी 50 रु प्रमाणे 80,000 रु व 16 प्लॅस्टिक ड्रम प्रत्येकी किमंत 500 रु प्रमाणे 8000 रु असा एकुण जु.कि. 88000 रु चा मुद्देमाल,तसेच बेवारस लोखंडी व प्लास्टिक ड्रम मधील मोह रासायन तसेच भट्टी चे साहित्य साधणे असा 1,72,000/- चा मुद्देमाल, एकूण 2,60,000/- चा मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला.

   नमुद घटना ता. वेळी स्थळी मुखबीरच्या खबरेवरून पंच व पोस्टॉफच्या मदतीने यातील आरोपींतावर प्रो.रेड केला असता यातील नमुद दोन्ही आरोपी त्यांचे घराचे बाजुला असलेल्या एका टिनाचे शेडमध्ये जमिनीत गाडलेल्या प्लॅस्टिक ड्रममध्ये गावठी मोहा दारु गाळण्याकरीता कच्चा मोहा सडवा रसायन तयार करीत असतांना पंचासमक्ष रंगेहात मिळुन आले. त्यांचे ताब्यातुन 16 प्लॅस्टिक ड्रममध्ये अंदाजे 100 लीटर प्रमाणे 1600 लीटर कच्चा मोहा सडवा प्रत्येकी 50 रु प्रमाणे 80,000 रु व 16 प्लॅस्टिक ड्रम प्रत्येकी किमंत 500 रु प्रमाणे 8000 रु असा एकुण जु.कि. 88000 रु चा मुद्देमाल विनापा सपरवाना अवैधरित्या मिळुन आल्याने मौक्का जप्ती पंचनाम्या प्रमाणे कार्यवाही करून फिर्यादी याचे लेखी रिपोर्ट वरून वर नमुद आरोपीतांविरुध्द सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

     सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नूरूल हसन सर, मा अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सागर कवडे सर, मा. उपविभागीय पोलिस अधिकारी सा वर्धा यांचे निर्देशाप्रमाणे पोलिस स्टेशन सावंगी चे पो.नी. मा. श्री. धनाजी जळक यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात पोस्टे सावंगी येथील अधीकारी व अंमलदार यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये