Sudarshan Nimkar
ताज्या घडामोडी

पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवारांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महारक्तदान यज्ञाला राजुरा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद

210 दात्यांनी केले रक्तदानाचे राष्ट्रीय कार्य

चांदा ब्लास्ट शहर प्रतिनिधी

आशिष यमनुरवार, राजुरा

जिल्ह्यातील लोकप्रिय नेते, विकास पुरुष, राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्हाचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त दि.30 जुलै 2023  रोजी सुधीरभाऊ मुनगंटीवार मित्र परिवाराच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. ह्या शिबिरात 210 रक्तदात्यांनी उस्फूर्तपणे सहभागी होऊन राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदविला. रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी आमदार सुदर्शन निमकर व माजी आमदार ऍड. संजय धोटे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

या रक्तदान शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे रामपूर येथील सरपंच वंदना गौरकर यांच्या नेतृत्वात ग्रा. पं. रामपूर येथील तब्बल 90 युवक, युवती व नागरिकांनी ना. सुधीर मुनगंटीवार यांनी रामपूर ग्रा.पं. राजुरा नगर परिषदेमध्ये समाविष्ट करण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराने प्रेरित होऊन मोठ्या संख्येने रक्तदान केले. रामपूर येथील नागरिक पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या कार्याबद्दल मोठे आशावादी आहे. या रक्तदान शिबिरात बहुतांश रक्तदाते रामपूर या गावातील होते हे विशेष.

रक्तदान शिबिर यशस्वी करण्याकरिता माजी आमदार सुदर्शन निमकर सह भाजप जिल्हा उपाध्यक्ष सतिश धोटे, नामदेवराव गौरकर, भाजप कामगार आघाडीचे महादेव तपासे, महामंत्री दिलीप वांढरे, भाजयुमो अध्यक्ष सचिन शेंडे, प्रदिप पाला, चूनाळा ग्रा.पं.चे सरपंच बाळु वडस्कर, कृ.ऊ.बा.समिती उपसभापती संजय पावडे, खामोना ग्रा.पं.सरपंच हरिदास झाडे, राजकुमार भोगा, श्रीकृष्ण गोरे, नवनाथ पिंगे, प्रदिप बोबडे, सुरेश रागीट, रामपूर ग्रा.पं.सरपंच वंदना गौरकर, उपसरपंच सुनिता उरकुडे, मंगला सोनेकर, श्रीनिवास मंथनवार, सुमा अफ्रिन, मंजुषा अनमुलवार, देवाडा सरपंच शंकर मडावी, शिवकुमार बोंकुर, भिमराव पाला, प्रकाश फुटाणे, रामास्वामी रावला, सूरज हरीहर, विशाल जानवे, रवी बुरडकर, यांनी परिश्रम घेतले. या शिबिराला भाजपा नेते अरुण मस्की, भाजपा तालुकाध्यक्ष सुनील उरकुडे, महामंत्री ॲड. प्रशांत घरोटे, मिलींद देशकर, राकेश हिंगाने, भाजप महिला आघाडी अध्यक्ष सुनंदा डोंगे, संदिप गायकवाड, पराग दातारकर, विनायक देशमुख, संजय उपगन्लावार, कैलाश कार्लेकर, राकेश हिंगाने, सतीश कोमरवेलीवार, संदिप पारखी, संजय जयपुरकर, वामन तुरानकर, दीपक झाडे, अजय राठोड, राहूल सूर्यवंशी, बादल बेले यांच्यासह कार्यकर्ते व ना.सुधीर मुनगंटीवार ह्यांचे चाहते उपस्थित होते. रक्तदान शिबिराला नक्षत्र सेलेब्रेशन सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल संचालक प्रशांत गुंडावार व दिनकर आकनुरवार यांचा माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये