Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रानटी डूकराने दोन महिलांवर चढविला हल्ला

एक गंभीर जखमी तर एकीला किरकोळ दुखापत

चांदा ब्लास्ट

मूल तालुक्यात सध्या शेतातील धान रोवनीचे मोसम जोरात सुरू आहे. अशातच तालुक्यातील चांदापूर येथे अनेक महीला रोवनी करून घरी परत येत असताना, गावा लगत अगदी गोंडपिपरी रोडवरती काल दि.३०/७/२०२३ रोजी सायंकाळी सहा वाजता चे दरम्यान,अनेक अचानक रानटी डूकराने दोन महीलावर हल्ला चढवून महीलाना खाली पाडले.त्यात ज्योती रविंद्र कडूकार हिला चावा घेतल्याने गंभीर जखमी झाली. बेशुद्ध अवस्थेत तिला तात्काळ मूल येथील ग्रामीण रूग्णालयात भरती करण्यात आले.

तिचे वर उपचार सुरू आहे. तर एका महिलेला किरकोळ दुखापत झाली ती घरीच आहे.

वरील घटनेमूळे गावात रानटी जनावरांनमूळे नागरिकांत दहशतीचे वातावरण पसरले आहे.

काल परवाच मेंढ्या राखणारे मेंढपाळ यांना चांदापूर गावा लगत वाघाचे दर्शन झाल्याचे निदर्शनात आले होते.

शासनाने जनावराचे बंदोबस्त करावे. शेतातील कामें कसें करावे अशी भीती शेतकरी बांधवांमध्ये निर्माण झाली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये