ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बोर व्याघ्र प्रकल्प घोषित गरमसूर गावातील पाणीटंचाईकडे आणी पुनर्वसन कडे जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देण्याची गावकर्यांची मागणी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील अत्यंत दुर्गम व बोर व्याघ्र प्रकल्प बाधित पुनर्वसित गाव म्हणून घोषित असलेल्या गरमसूर गावात सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज वणवण भटकंती करावी लागत असून महिलांवर व ज्येष्ठ नागरिकांवर त्याचा सर्वाधिक परिणाम होत आहे.

गेल्या काही वर्षांत जलप्राधिकरणामार्फत विहीर खोलीकरण तसेच नवीन नळपाणी पुरवठा योजनेची कामे करण्यात आली होती. या कामांवर लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला असला तरी आजही गावकऱ्यांना नियमित व पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे शासनाच्या योजनांवर खर्च होऊनही नागरिकांच्या मूलभूत गरजेचा प्रश्न कायम असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.

सध्या उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे गावातील विहिरी व जलस्रोत आटण्याच्या स्थितीत आले आहेत. परिणामी महिलांना व विद्यार्थ्यांना अनेक किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याने ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.

ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी व तहसीलदार शकुंतला पाराजे मॅडम यांनी संबंधित प्रशासनाने तात्काळ गावाची पाहणी करून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा, बंद पडलेल्या नळयोजनेची चौकशी करावी तसेच कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी केली आहे. पाणी हा मूलभूत हक्क असून आदिवासी बहुल व पुनर्वसित गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणे ही गंभीर बाब असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

गरमसूर गावातील वाढत्या पाणीटंचाईच्या आणी वाघा च्या समस्येकडे जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन लवकरात लवकर पुनर्वसन ची प्रक्रिया पूर्ण करावा नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये