ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

धरण उश्याशी, कोरड घशाशी ; १४ वर्षापासून जलकुंभ वनवासात! जल जीवन मिशन चे 39लाख रुपये कोणाच्या घशात

बोरी कोकाटे येथील नागरिकांची व्यथा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

गावाला शुद्ध पाणीपुरवठा व्हावा व नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून शासनाने प्रत्येक गावात जल जीवन मिशन अंतर्गत नळ योजना कार्यान्वित केल्या. मात्र, १४ वर्षांचा दीर्घ काळ लोटूनही पर्यटनस्थळ महणून ओळखल्या जाणाऱ्या बोरी येथील जलकुंभाला वनवास सोसावा लागत आहे.

तालुक्यातील पर्यटनस्थळाच्या कुशीत वसलेले बोरी (कोकाटे) हे गाव गेल्या १४ वर्षांपासून शुद्ध पाण्यापासून वंचित आहे. येथे शुद्ध पाण्याचे स्त्रोत तयार होण्याकरिता जल जीवन मिशन अंतर्गत सन २०१० ते २०११ या काळातील सरपंच अमर कोकाटे यांनी जल जीवन योजनेतर्गत बसस्थानक परिसरात मोठी पाण्याची टाकी व या लगत नवीन परिसरात । विहीर खोदकाम करण्यात आले होते.

गावात उभारण्यात आलेली

पाण्याची टाकी

टाकीचे बांधकाम होत असताना गावामध्ये अतिशय आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. आता लवकरच शुद्ध पिण्याचे पाणी घरीच मिळणार, अशी अपेक्षा नागरिकांना होती. पण, त्यांचा आनंद हा जास्त काळ टिकून राहिला नाही. तात्कालीन सरपंचाचा कार्यकाळ काही दिवसातच संपता आणि टाकीचे काम अपूर्ण  आपल्या कार्यकाळात जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरात नळ योजनेतून सर्व नागरिकांना मोफत नळाचे कनेक्शन देण्यात आले. काम सुरू असताना आपल्याला पायउतार करण्यात आले. त्यामुळे या कामाकडे आपले दुर्लक्ष झाल्याची प्रतिक्रिया माजी सरपंच विशाल भांगे यांनी दिली.

टाकीत पाणी पोहोचलेच नाही.

 त्यानंतर दुसऱ्या कार्यकाळात रोशन मस्के हे सरपंचपदी आले.ज्यांना नळ योजनेचा लाभ हवा आहे त्यांनी अर्ज करून व अनामत रक्कम भरून लवकरात लवकर नळ योजनेचा लाभ घ्यावा, अशी विनंती सरपंच मस्के यांनी केली. या वर ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात पैसेसुद्धा भरले असतानासुद्धा नळ घरापर्यंत पोहोचलेच नाही, तोपर्यंत मस्के यांचासुद्धा कार्यकाळ लोटून गेला. त्यानंतर लगेच निवडणुका झाल्या आणि विशाल भांगे सरपंच झाले. त्यांनी निर्णय घेत पिण्याच्या पाण्याची ठेकेदाराकडून आपल्या ग्रामपंचायतकडे हस्तांतरित करून पाणी वाटप करण्याकरिता नवीन कर्मचाऱ्यांची निवडसुद्धा केली. परंतु, काही महिने लोटल्यावर गावातीतल जल वाहिनी फुटने सुरू झाले. परिस्थिती लक्षात घेता त्यांनी प्रयत्न करून ३९ लाख रुपयांचा निधी जल जीवन योजनेतर्गत खेचून आणता व नवीन जलकुंभ परिसरात उभारून तेथील नागरिकांना पाण्याची व्यवस्था करून दिली. परंतु, जुन्या टाकील गत असलेल्या नागरिकांना आजपर्यंत पाणी मिळालेच नाही.

येथील ३० ते ४० घरांकरिता वेगळी पाण्याची टाकी करण्यात आली. परंतु, गावातील व शांतीनगर भागात गेल्या अनेक दिवसांपासून या टाकीतून पाणीच आले नसल्याची खंत ग्रामस्थ शेखर बुधबावरे यांनी व्यक्त केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये