ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ओबीसी समाजाची स्वतंत्र जातनिहाय जनगणना करण्याची मागणी

पंतप्रधानांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

सेलू : सलून ब्युटी पार्लर असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने ओबीसी समाजाची स्वतंत्र जातनिहाय जनगणना करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन पंतप्रधानांना पाठविण्यात आले आहे. या निवेदनावर प्रदेशाध्यक्ष श्री. निलेश दिवाकर अत करे यांची स्वाक्षरी असून जिल्हाधिकारी वर्धा यांच्यामार्फत हे निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, देशातील इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजाची अचूक लोकसंख्या, सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थितीची माहिती उपलब्ध नसल्याने शासनाच्या विविध योजना, आरक्षण धोरणे व विकासात्मक निर्णय प्रभावीपणे राबविण्यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे ओबीसी समाजाची स्वतंत्र जातनिहाय जनगणना करणे अत्यावश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

तसेच जनगणनेतून समाजाची वास्तविक लोकसंख्या, शैक्षणिक प्रगती, आर्थिक परिस्थिती, रोजगारातील सहभाग व सामाजिक स्तर यांचे अचूक चित्र समोर येईल. या माहितीच्या आधारे शासनाला अधिक परिणामकारक धोरणे आखणे शक्य होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

निवेदनात केंद्र सरकारने जनगणनेतील त्रुटी दूर करून ओबीसी प्रवर्गासाठी स्वतंत्र रकाना समाविष्ट करावा, आगामी जनगणनेत ओबीसी समाजाची स्वतंत्र जातनिहाय नोंद घ्यावी, जनगणनेतील माहिती सार्वजनिक करून समाजहिताचे निर्णय घ्यावेत तसेच लोकसंख्येच्या प्रमाणात विविध क्षेत्रांतील प्रतिनिधित्व व कल्याणकारी योजनांचे नियोजन करावे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.

सामाजिक न्यायाच्या दृष्टीने या मागण्यांचा सकारात्मक विचार करून योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा सलून ब्युटी पार्लर असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.या वेळेस नाभिक समाज प्रदेश अध्यक्ष निलेश अतकरे. प्रदेश कोषाध्यक्षय अनिल अमोलकर सचिव निलेश खरवडे स्वप्नील घुमे साधेराव वाटकर विवेक अतकारे तुषार चौधरी आदी समस्त नाभिक समाज व ओ. बी. सी. वर्ग उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये