ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रुग्णांना फळवाटप करून अजितदादांना आदरांजली

गोंडपिपरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसकडून सामाजिक उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते तथा महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री, लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, गोंडपिपरीच्या वतीने ग्रामीण रुग्णालय, गोंडपिपरी येथे रुग्णांना फळवाटपाचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमातून रुग्णांना फळांचे वाटप करून त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच समाजाप्रती बांधिलकी जपत सामाजिक कार्यात सातत्याने सहभागी राहण्याचा संदेशही यावेळी देण्यात आला.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष मनोज धानोरकर, महिला तालुका अध्यक्षा वंदना कामडे, युवा नेते नितेश मेश्राम, जिल्हा सचिव नरेश कोसरे यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कमलेश पिलेवान, वैद्यकीय अधिकारी डॉ. मनमित, प्रतीक्षा खैरकर, पूजा नैताम, मालन गेडाम, माधुरी कुळसंगे, शोभा चांदेकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी रुग्णांशी संवाद साधत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली व त्यांना धीर दिला. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक उत्तरदायित्व जपणारे असे उपक्रम पुढेही राबविण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या उपक्रमाचे रुग्ण, त्यांच्या नातेवाईक तसेच रुग्णालय प्रशासनाने स्वागत करून आयोजकांचे कौतुक केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये