ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आ. सुभाष धोटेंनी केली कोरपन्यातील पूरपरिस्थितीची पाहणी.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

आमदार सुभाष धोटे यांनी कोरपना तालुक्यातील अनेक गावांना भेटी देऊन स्थानिक नुकसानग्रस्त शेतकरी, ग्रामस्थ यांच्या अडचणी जाणून घेतल्या. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, सुरेश मालेकर, तहसीलदार प्रकाश वऱ्हाटकर, कृषी अधिकारी ढोणे, सदरील गावचे कृषी सहाय्यक, तलाठी व इतर अधिकारी यांना सोबत घेऊन कोरपना तालुक्यातील पूरग्रस्त भागाचा आढावा घेतला. पूर परिस्थितीमुळे गडचांदूर भोयेगाव चंद्रपूर मार्गावरील नदी पुलावर गाळ साचल्यामुळे मोटरसायकल व इतर वाहन चालक गाडीने पडून अपघात होत असल्यामुळे तातडीने फायरब्रिगेड गाडी बोलावून रस्ता व्यवस्थित करण्याचे आदेश दिले. संबंधित विभागाने तातडीने ही व्यवस्था करून रस्ता मोकळा केला. तसेच परिसरातील शेतपिकांची पाहणी केली, मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सर्व्हेक्षण करून शासनाकडे अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

या प्रसंगी भोयागांव येथे सरपंच बोढे, बंडू चौधरी, दिनकर पा टाले, एकनाथ गोखरे, किसन डोंगे, अविनाश लांजेकर, दीपक पानघटे, सौ शालिनी बोंडे, अंतरगाव येथे प्रमोद पिळलशेंडे, मंगेश वडस्कर, पंकज वणकर, अमोल वडस्कर, बाळा पा वडस्कर, गजानन मोरे, सुरेश पा पिपळशेंडे, दिनेश काकडे, सांगोडा येथे वामन पा मुसळे, माणिकराव देवाळकर, संजय ढवस, विजय कोल्हे, चरण देवळकर, शुभम ढवस, बालाजी पा कोल्हे, गौरव पाचभाई, विठ्ठोबा बोंडे, वडगांव येथे श्रीराम भोंगळे, सुदर्शन डवरे, उपसरपंच अशोक आस्कर, संगीता मडावी, सदस्य दिगंबर लांजेकार, शंकर उरकुडे, राहुल गाडवे, कैलास मेश्राम, गुलाब जीवतोड, शामकांत निखाडे यासह भोयेगाव, भारोसा, सांगोळा, अंतरगाव या गावातील नागरिक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये