ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन आवारपुर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन, आवारपूर आपल्या सामाजिक दायित्वांच्या कार्या द्वारे शिक्षणाची गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांचे मनोबल वाढावे हे लक्षात घेता सभोवतालील गावातील 10 वी व 12 वी च्या एकूण 21 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार २९ जुलै ला करण्यात आला. यात 10 वी च्या मराठी, इंग्लिश व सेमी इंग्लिश तर 12 वी च्या कला, विज्ञान, वाणिज्य व एम सी व्ही सी शाखेतील विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

या कार्यक्रमाला श्री. संदीप देशमुख, उपाध्यक्ष (तांत्रिक सेवा), श्री. नमित मिश्रा, उपाध्यक्ष (मानव संसाधन), श्री. सौदीप घोष, उपाध्यक्ष (माईन्स), श्री. नारायण दत्त तिवारी, श्री. सतीश मिश्रा, श्री. किरण क‌रमरकर तसेच शिक्षक व पालक वर्ग उपस्थित होते.

यावेळी प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी मोलाचे मार्गदर्शन केलेत व सत्कार केला.

कार्यक्रमाचे संचालन सी. एस. आर. प्रमुख श्री प्रतीक वानखेडे तर आभार प्रदर्शन श्री सचिन गोवारदिपे यांच्या द्वारा करण्यात आले.
या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता सचिन गोवारदिपे, संजय ठाकरे व देविदास मांदाळे यांनी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये