राज्यस्तरीय उत्कृष्ट प्रतिभा पुरस्कारासाठी भद्रावतीच्या मंगेश पवार यांची निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती येथील यशवंतराव शिंदे विद्यालयाची सहाव्या वर्गातील चिमुकली शिफा मंगेश पवार हीची राज्यस्तरीय “उत्कृष्ट प्रतिभा पुरस्कार” साठी निवड करण्यात आली आहे. नाशिक येथील तेजस बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या वतीने त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत हा सन्मान करण्यात आला आहे.
संस्थेच्या पुरस्कार निवड समितीने शिफा मंगेश पवार हीच्या विविध क्षेत्रातील कार्याचा आढावा घेत तीची निवड निश्चित केली होती. हा पुरस्कार ३१ मे २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आयोजित भीमशब्द साहित्य संमेलनात प्रदान करण्यात आला आहे.
पुरस्कार निवडीबाबत संस्थेच्या अध्यक्षा मेघा डोलस यांनी निवडपत्राद्वारे माहिती देत शिफा मंगेश पवार हीचे अभिनंदन केले असून, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
हा राज्यस्तरीय सन्मान मिळाल्याने भद्रावती शहरासह परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून शिफा मंगेश पवार हीच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



