ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हाधिकारी वर्धा यांचा ‘ग्रामस्थांशी संवाद’

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

सेलू तालुक्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याच्या उद्देशाने वर्धा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती वानमःथी सी. यांचा ‘ग्रामस्थांशी संवाद’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

हा कार्यक्रम शुक्रवार, दिनांक ५ जून २०२६ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सालई (पेवठ), ता. सेलू, जि. वर्धा येथे आयोजित करण्यात आला आहे. या संवाद कार्यक्रमाद्वारे ग्रामस्थांना आपल्या विविध समस्या, अडचणी तसेच विकासकामांबाबतच्या सूचना थेट जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडण्याची संधी उपलब्ध झाली होती

तहसील कार्यालय, सेलू येथील तहसीलदार शकुंतला पाराजे व पंचायत समिती गटविकास अधिकारी श्री. देवानंद जी पानबुडे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासनाच्या विविध योजनांबाबत माहिती घेतली तसेच गावकरी व परिसरात तील ग्रामस्थानी या वेळेस आपल्या समस्या मांडल्या प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेला हा उपक्रम

ग्रामीण भागातील नागरिक व प्रशासन यांच्यातील संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.या कार्यक्रमांस गावातील तसेच परिसरातील मोठया संख्येने स्त्री. पुरुष उपस्थित राहून सर्वीकडे या कार्यक्रमांची आणी जिल्हाधिकारी यांची स्तुती होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये