ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर वाहतूक शाखेची कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा : जिल्ह्यातील वाढते अपघात कमी करण्यासाठी तसेच नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे यासाठी वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. मा. अपर पोलीस अधीक्षक मस्तानिया वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरू असून दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलली जात आहेत.

दि. 20 मे 2026 रोजी कलम 185 मोटार वाहन कायद्यान्वये वाहतूक नियंत्रण शाखेचे अंमलदार सफी अन्सारी तिवारी (ब.नं. 864), पोहेका चंद्रकांत तायडे (ब.नं. 1422), पोशी दिलीप कामडी (ब.नं. 963) व पोशी प्रदीप कोकडे (ब.नं. 983) यांनी पेट्रोलिंग दरम्यान दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या चालकावर कारवाई केली.

कारवाई करण्यात आलेल्या वाहन चालकाचे नाव विशाल प. गोंडे (वय 28 वर्षे, रा. वॉर्ड क्र. 1, सिंदी मेघे, वर्धा) असे असून त्यास इटवारा चौक येथे तपासणीदरम्यान थांबविण्यात आले. ब्रेथ अॅनालायझर तपासणीत त्याच्या रक्तात 375.8 mg अल्कोहोल आढळून आले. त्यानंतर संबंधित चालकाविरुद्ध दारूच्या नशेत वाहन चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

वाहतूक नियंत्रण शाखेने नागरिकांना आवाहन केले आहे की, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर करावा, अतिवेग टाळावा तसेच दारू पिऊन वाहन चालवू नये. अपघात प्रतिबंधासाठी ही विशेष मोहीम संपूर्ण वर्धा जिल्ह्यात सातत्याने राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा, वर्धा यांनी दिली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये