ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कस्तुरबा गांधी हॉस्पिटल सेवाग्राम येथे डॉक्टरांचा चालत असलेला भोंगळ कारभार

डॉक्टर खेळत आहे रुग्णांशी जिवाचा खेळ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

कस्तुरबा गांधी रुग्णालयाचे डीन डॉ.शुक्ला व वैद्यकीय अधीक्षक डॉ पुनम वर्मा यांनी लक्ष देऊन चुकीचे काम करणाऱ्या अधिकारीवर कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकांना कडून करण्यात येत आहे.

दिनांक 2 मे 2026 रोजी रुग्ण नामे बशीर सुलेमान बेग वय 74 वर्ष राहणार गोंड मोहल्ला आंबेडकर गार्डन जवळ वर्धा यांना उपचारासाठी सकाळी कस्तुरबा गांधी रुग्णालय सेवाग्राम येथे सकाळी 10 ते 11 वाजता दरम्यान नेऊन सत्य साईबाबा तपासणी करण्यात आली यानंतर भरती करुन मेडिसीन विभाग 33 येथे पाठविण्यात आले यावेळी डॉ मिना चौधरी यांनी रुग्णांची तपासणी करून नातेवाइकांना सांगितले की रुग्णांची प्रकृती खूप चिंताजनक असल्याचे सांगून त्यांना तुम्ही 47,696/- रुपये भरून त्यांची मला दाखवून द्यावी यानंतर त्यांची तपासणी करावी लागणार आहे म्हणून घराच्या लोकांनी 47,696/-रुपये भरल्याची पावती डॉक्टरांना दाखवून रुग्णाला आय.सी.यो. मध्ये भरती करण्यात आले परंतु आज दिनांक रोजी घराच्या लोकांनी डॉक्टरांना विचारलेले असताना डॉक्टरांनी सांगितले की तुमच्या पेशंटची प्रकृती खूपच चिंताजनक आहे असे प्रति उत्तर देण्यात आले तर घरच्या लोकांनी सांगितले की आम्ही आमच्या व्यक्तीला दुसरीकडे घेऊन जाऊ शकतो काय तर त्यांनी प्रति उत्तर असे दिले की तुम्ही उदयाला तुमच्या पेशंटची शवबाॅडी घरी घेऊन जाऊ शकतात असे म्हटले असताना घरच्या लोकांनी इकडून तिकडून पैसे जमा करून त्यांना सुट्टी करून नागपूर हलविण्यात आले तर या गोष्टीकडे सेवाग्राम हाॅस्पिटलचे डिन डॉ शुक्ला तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ.पुनम वर्मा यांनी तसेच वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ पंकज भाऊ भोयर यांनी या गोष्टीकडे लक्ष देऊन मेडिसीन विभाग 33 येथे कार्यरत असलेल्या डॉ मिना चौधरी यांची चौकशी करून यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी रुग्णांच्या नातेवाइकांना कडून होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये