ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“मेफेड्रॉन (एम.डी. ड्रग्स) अंमली पदार्थाची विक्री करणा-या सराईत गुन्हेगार व त्याचे पत्नीवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही”

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

  वर्धा पोलीस अधीक्षक मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणारे गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेस आदेशीत केल्याने, त्या अनुषंगाने अंमली पदार्थांची विक्री करणा-या गुन्हेगारांवर कारवाई करण्याची स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहिम राबविली असुन, दि. 21 मे 2026 रोजी स्था.गु.शा. वर्धा चे पथकास मिळालेल्या गोपणीय माहितीवरून पोलीस स्टेशन वर्धा शहर हद्दीतील मॉडेल हायस्कुल जवळ अशोक नगर तारफैल वर्धा येथे राहणा-या रहिम शेख याचे राहते घरी एन.डि.पी.एस. कायद्यान्वये रेड केला असता, तेथे आरोपी 1) शेख रहिम शेख रशीद, वय 42 वर्ष व त्याची पत्नी 2) शहाणा जाफीर शेख, वय 36 वर्ष असे संगणमताने मेफेड्रॉन (एम.डी. ड्रग्स) अंमली पदार्थांची विक्री करतांना मोक्कावर रंगेहाथ मिळुन आले असुन, सदर मेफेड्रॉन (एम.डी. ड्रग्स) चा पुरवठा आरोपी 3) वसीम अहमद खान पठाण याने केल्याचे निष्पन्न झाल्याने, जागीचं जप्ती पंचनामा कार्यवाही करून, आरोपीतांचे ताब्यातुन निव्वळ 04 ग्रॅम 50 मिलीग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी. ड्रग्स) अंमली पदार्थ जु.कि. 18,000 रू चा मुद्देमाल जप्त करून, तिन्ही आरोपीतांविरूध्द पो.स्टे. वर्धा शहर येथे एन.डि.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा नोंद केला.

  सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, स.पो.नि. आशिषसिंग ठाकुर, पो.उपनि. सलाम कुरेशी, पो.अं अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवि पुरोहित, सागर भोसले, अक्षय राऊत, अभिषेक नाईक, निलीमा उमक सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केल

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये