सेलू शहरातील पाणीटंचाईबाबत नगरपंचायतीला निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
सेलू शहरातील प्रभाग क्रमांक ५ मधील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी चे वातावरण निर्माण झाले आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे विधानसभा संघटक रोशन विलासराव राऊत यांनी नगरपंचायत प्रशासनाला निवेदन सादर केले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, काही ठिकाणी अनावश्यक मोटारी बसवून तसेच अनधिकृत नळ कनेक्शन घेऊन पाण्याचा उपसा केला जात आहे. त्यामुळे इतर नागरिकांना नियमित व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे.
या समस्येमुळे महिला व ज्येष्ठ नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात वणवण करावी लागत असून नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नगरपंचायतीने तातडीने प्रभाग क्रमांक ५ ची पाहणी करून अनावश्यक मोटारी व अनधिकृत नळ कनेक्शन हटवण्याची कारवाई करावी, तसेच सर्व नागरिकांना समान व नियमित पाणीपुरवठा सुनिश्चित करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
हे निवेदन रोशन विलासराव राऊत, विधानसभा संघटक, शिवसेना शिंदे गट, सेलू-वर्धा यांनी दिले आहे.



