ताज्या घडामोडी

आज सावली शहरासह तालुक्यातील सर्व मेडिकल बंद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

ऑनलाईन फार्मसी कंपन्यांकडून होत असलेल्या कथित नियमबाह्य औषध विक्रीविरोधात औषध विक्रेते आक्रमक झाले आहेत. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची योग्य पडताळणी न करता औषध विक्री केली जात असल्याचा आरोप संघटनांकडून करण्यात येत आहे. तसेच मोठ्या ई-फार्मसी कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या सवलतींमुळे लहान आणि मध्यम औषध विक्रेत्यांच्या व्यवसायावर मोठा परिणाम होत औषधं विक्री करणाऱ्या कंपन्या, लागलीच घरपोच औषधं पोहचवणारे ॲप्स, ऑनलाईन औषधांची विक्री, खरेदीवर मोठी सवलत, एआयचा वापर करून तयार करण्यात येणारे प्रिस्क्रिप्शन सारख्या मुद्यांवर अत्यंत नाराज आहेत. AIOCD ने सरकारकडे दोन मोठ्या मागण्या केल्या आहेत. GSR 817(E) आणि GSR 220(E) चा का होत आहे सर्वाधिक याचा विरोध म्हणून AIOCD MSCDA द्वारा प्रस्तावित दि.२०.०५.२०२६ च्या बंद च्या पार्श्वभूमीवर आज सावली तालुका केमिस्ट & DRUGIST सावली च्या वतीने क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला हार लावून मूक मोर्चा काढण्यात आला. केमिस्ट एकता जिंदाबाद असे नारे देण्यात आले.

मात्र सावली शहरासह तालुक्यात 100 टक्के मेडिकल आज बंद आहे, या मूक मोर्चा प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष श्री.मा. सचिनजी चिंतावार,सावली तालुका अध्यक्ष गजानन टोंगे,सचिव रविभाऊ ताटकोंडावार,सचिव नितेश खेडेकर, सदस्य अंकुश दाजगाये,राकेश धानोरकर,आकाश जाम्भूलकर,साहिल रामटेके,विनोद राउत,उल्हास कांबळे,विशाल रोगे,वृषाली बेजगंमवर, कांचन शेंडे हे उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये