जुळ्या बहिणींची पोलिस दलात निवड
ॲड. वामनराव चटप यांनी घरी जाऊन केला सत्कार

चांदा ब्लास्ट
कोरपना तालुक्यातील हेटी या गावातील जयश्री मारोती बुच्चे व भाग्यश्री मारोती बुच्चे या दोन जुळ्या बहिणींनी अथक परिश्रम व जिद्दीच्या जोरावर खाकी वर्दीला गवसणी घातली आहे. साधने अपुरी असली, पुरेशी सुविधा नसली तरी त्यावर मात करून कठोर परिश्रमाने या दोन्ही बहिणींनी हे यश मिळविले आहे. या तरुणींचे कौतूक करण्यासाठी शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी त्यांच्या हेटी गावी जाऊन शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व पुस्तक भेट देऊन त्याचा सत्कार केला.
कु. जयश्री हीची नागपूर पोलिस दलात तर कु. भाग्यश्री हीची चंद्रपूर पोलिस दलात निवड झाली आहे. अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील या मुलींनी शेतीत कष्ट करीत आपले शिक्षण व स्पर्धा परीक्षेची तयारी पुर्ण केली आणि यश मिळविले, याबद्दल ॲड. वामनराव चटप यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी शेतकरी संघटनेचे नेते सुनिल बावणे, ॲड.श्रीनिवास मुसळे, रमाकांत मालेकर, बळीराम खुजे, रत्नाकर चटप, मारोती बुच्चे, किसन बुच्चे, संभाजी जगनाडे, खंडू बुच्चे, ग्रा.पं.सदस्य सुधाकर तुराणकर, अनिल केळकर, गणेश जगनाडे, प्रफुल्ल बुचे, मारोती धवने, सुनिता बुच्चे, अस्मिता बुच्चे आणि गावातील नागरिक उपस्थित होते.



