ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सिलेंडरच्या स्फोटात घर जळाले. आ. किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून पीडित कुटुंबाला मदतीचा हात..

चांदा ब्लास्ट

  शहरातील नगिनाबाग परिसरात सिलेंडरचा स्फोट होऊन घराला आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेत स्वरस्वती गिरडकर यांचे घर पूर्णतः जळून मोठे नुकसान झाले असून घरातील जीवनावश्यक साहित्य, कपडे, धान्य तसेच इतर संसारोपयोगी वस्तू आगीत भस्मसात झाल्या. या दुर्घटनेची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार यांच्या निर्देशानुसार भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकार्यांनी घटनास्थळी भेट देत पीडित कुटुंबीयांची विचारपूस केली तसेच त्यांना तातडीची मदत उपलब्ध करून दिली.

           या आगीत घरमालक गिरडकर कुटुंबासह किरायेदार कन्हैयालाल ननेट यांचेही मोठे नुकसान झाले आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर मोठे संकट कोसळले आहे. पीडित कुटुंबीयांना दिलासा देण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने एक महिन्याचे रेशन तसेच आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी भाजप पदाधिकार्यांनी कुटुंबीयांना धीर देत आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल, सांगण्यात आले.

     तसेच या दुर्घटनेत नुकसान झालेल्या कुटुंबांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने पंचनामा करून आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचनाही आमदार किशोर जोरगेवार यांनी संबंधित प्रशासनाला दिल्या आहेत. गरजू नागरिकांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही आपली जबाबदारी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या महामंत्री सविता दंढारे, विधानसभा अध्यक्ष वंदना हातगावकर, अल्पसंख्याक महिला अध्यक्ष कौसर खान, निलिमा वनकर आदिंची उपस्थिती होती

.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये