ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विश्वशांती विद्यालयाचे पाच विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र

उज्वल यशाची परंपरा कायम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे सत्र २०२५ – २६ करिता इयत्ता ५ आणि इयत्ता ८ वी साठी आयोजन करण्यात आलेले होते सदर परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला त्यात भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावलीद्वारा संचालित विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय सावली येथील इयत्ता पाचवीचे चार विद्यार्थी तर इयत्ता आठवीची एक विद्यार्थिनी उत्तीर्ण होऊन पात्र झालेले आहेत.त्यात वर्ग पाचवी करिता समीर चरणदास मांदाडे,प्रीतम हिम्मतलाल आभारे,इच्छा अरविंद कातकर,मारिया रेकचंद फाले, तर आठवी करिता सृष्टी धनराज बोदलकर या विद्यार्थांनी शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण होऊन पात्र ठरलेले आहेत.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विश्वशांती विद्यालयाने शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांचे भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संदीपभाऊ गड्डमवार, सचिव राजाबाळ पाटील संगीडवार तथा सर्व पदाधिकारी,विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार,पर्यवेक्षक राजेश झोडे,विषय शिक्षक प्रवीण काटपल्लीवार. राजेश मांडाले ,रवींद्र कन्नाके. काजल बारापात्रे तसेच सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करीत पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या….

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये