ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नवरत्न स्पर्धेत पिंपळगाव शाळा अव्वल

विविध स्पर्धेत ठरले विजयी

चांदा ब्लास्ट

कोरपना येथे तालुकास्तरीय नवरत्न स्पर्धा दिनांक २४ जानेवारीला घेण्यात आली.त्यामध्ये माध्यमिक गटामध्ये स्मरणशक्ती स्पर्धा मध्ये सानिया वाढई  प्रथम,
दिप्ती गुरुनुले चित्रकला स्पर्धा प्रथम, त्याच प्रमाणे प्राथमिक विभाग गटामध्ये वादविवाद स्पर्धेत वैष्णवी प्रवीण जोगी प्रथम ,चित्रकला स्पर्धा हिमेश विठ्ठल तुराणकर प्रथम येऊन तालुक्याचं प्रतिनिधित्व जिल्हावर करणार आहे. त्याच प्रमाने माध्यमिक गटात  श्रुतिका बोढाले स्वयंस्पुर्त लेखन द्वितीय ,सानवी तुराणकर स्वयंस्पुर्त भाषण द्वितीय, लावण्या बोढाले द्वितीय कथाकथन यांनी सुद्धा शाळेचे नाव उंचावले.
दरवर्षीप्रमाणे तालुकास्तरीय नवरत्न स्पर्धेत प्रथम राहण्याची परंपरा पिंपळगाव शाळेने कायम राखली.
     या वेळी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सचिनकुमार मालवी, गडचांदुर केंद्राचे केंद्रप्रमुख पंढरी मुसळे  यांनी नवरत्नचे अभिनंदन केले. व पुढील स्पर्धेस शुभेच्छा दिल्या. शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष बंडू बोढाले व शाळेचे मुख्याध्यापक अशोक गोरे, विषय शिक्षक विजय आकनुलवार, निलेश मडावी, कु. रेखा झाडे , सौ. मंगला चटप, बाळकृष्ण गावंडे यांनी मार्गदर्शन केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये