बाखर्डीतील बाल संस्कार शिबिराला माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांची सदिच्छा भेट.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
बाखर्डी येथे आयोजित निवासी बाल सु-संस्कार शिबिराला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी सदिच्छा भेट देत विद्यार्थ्यांना संस्कार, शिस्त व राष्ट्रसेवेचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या उपस्थितीमुळे शिबिरातील विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी बोलताना सुभाषभाऊबाखर्डीतील बाल संस्कार शिबिराला माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांची सदिच्छा भेट. धोटे यांनी बालकांमध्ये नैतिक मूल्ये, सामाजिक बांधिलकी आणि भारतीय संस्कृतीची जपणूक करण्यासाठी अशा संस्कार शिबिरांची आवश्यकता असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच चांगले संस्कार आत्मसात करून समाजासाठी आदर्श नागरिक बनावे, असे आवाहन त्यांनी केले.
शिबिरामध्ये सामुदायिक प्रार्थना, शिस्त, योग, व्यक्तिमत्त्व विकास तसेच संस्कारपर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभत आहे.
या प्रसंगी शैलेश लोखंडे, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष बांदुरकर गुरुजी, डॉ. पाचभाई, गोहोकर महाराज, ताविडे महाराज, मारोती पानघाटे, प्रकाश उपरे, आकाश ताविडे, अमर ताविडे यांच्यासह गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिबिरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



