लायन्स क्लब ऑफ लातूरतर्फे दिपाली व अंजली श्रीपत राठोड यांना पर्यावरण क्षेत्रात राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
नागपूर : जैविक परसबाग उपक्रमासाठी नागपूरच्या दिपाली व अंजली श्रीपत राठोड या बहिणींना लायन्स क्लब ऑफ लातूरतर्फे राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. त्यांच्या कुटुंबाने एकत्रितपणे उभारलेल्या “वसंतराव नाईक परसबाग” या उपक्रमाची दखल घेत हा सन्मान देण्यात येत आहे.
आई-वडिलांच्या प्रेरणेतून आपल्या घराच्या टेरेसवर सेंद्रिय पद्धतीने “वसंतराव नाईक परसबाग” विकसित केली, या परसबागेत ९० हून अधिक विविध प्रकारच्या वनस्पतींसह ७०० पेक्षा अधिक झाडे जोपासण्यात आली आहेत. फळे, भाज्या, फुलझाडे, औषधी वनस्पती आणि विविध प्रजातींचा यात समावेश आहे.
ही परसबाग केवळ बागकामापुरती मर्यादित नसून पर्यावरणपूरक जीवनशैलीचा आदर्श ठरत आहे. सेंद्रिय खत निर्मिती, घरगुती जैविक कचऱ्याचे व्यवस्थापन तसेच इतर अनेक उपयुक्त पर्यावरणीय उपक्रम राठोड कुटुंबाकडून राबविण्यात येत आहेत.



