अवैध पैशाची देवाणघेवाण करणाऱ्या फिर्यादीचा विश्वासघात केल्याचे तक्रारीवरून फरार आरोपीस ठोकल्या बेडया

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
सदर गुन्हयाची हकिकत याप्रमाणे आहे. कि, फिर्यादी नामे प्रतीक जितेंद्र लोखंडे वय २३ वर्ष रा. गिटटीखदान जवळ बोरगांव मेघे वर्षा यांनी तन्मय भगत व त्याचा साथीदार सनी होलानी दोन्ही रा. वर्षा यांनी संगमत करून अंदाजे एका वर्षापुर्वी फिर्यादीला बँकेत खाते खोलण्यास सांगुन त्यांच्या बँक खात्याचा वापर स्वःच्या फायदयाकरीता करून त्यांचेवर अवैध्य पैशाची देवाणघेवाण करून फिर्यादीचा विश्वासघात केल्याचे तक्रारीवरून पोलीस स्टेशन वर्षा शहर येथे दिनांक ३००/४/२०२६ रोजी अपराध कमांक ५२९/२०२६ कलम ३१६(२), ३१८(२), ३५१, ३(५) भा.न्या. सं. सहकलम ६६ (ड) माहिती तंत्रज्ञान कायदा अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
सदर गुन्हयातील फरार आरोपी तन्मय किशोर भगत वय २५ वर्ष रा. समता नगर, वैशाली बुध्द विहार जवळ वर्षा हा गुन्हा दाखल झाल्यापासुन फरार होता. सदर गुन्हा तपासावर असतांना आरोपीचा शोध घेत असता सदर आरोपी हा नागपुर येथे राहत असल्याचे गुप्त बातमीदारा मार्फत माहिती प्राप्त झाल्याने सदर आरोपीचे शोध कामी एक पथक नागपुर येथे रवाना होवुन आरोपी हा राहत असलेल्या आयोध्या नगर, मानेवाडा, जयताळा, लोकमत चौक नागपुर इत्यादी ठिकाणी शोष घेत असतांना आरोपी हा लोकमत चौक नागपुर येथे मिळुन आल्याने त्यास पोलीस स्टॉफच्या मदतीने शिताफीने ताब्यात घेवुन गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्याने सदर गुन्हा केल्याचे कबुल केल्याने त्यास वर्धा येथे आणुन पुढील कार्यवाही करीता पोलीस स्टेशन वर्षा शहर यांचे ताब्यात देण्यात आले. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री. संतोष ताले साहेब पोलीस स्टेशन वर्धा शहर हे करीत आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक वर्धा, श्री. सौरभ अग्रवाल साहेब, अपर पोलीस अधीक्षक वर्धा, श्री. सदाशिव वाघमारे साहेब, उपविभागीय पोलीस अधीकारी वर्धा श्री. प्रमोद मकेश्वर साहेब, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी प्रभारी स्थानिक गुन्हे शाखा वर्षा तसेच ठाणेदार पोलीस स्टेशन वर्धा शहर श्री. संतोष ताले साहेब यांचे निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखा वर्धा येथील सपोनि आशिषसिंग ठाकुर, पोशि अभिषेक नाईक ब.क. ३३ पोलीस ठाणे वर्षा शहर तपास पथकातील पोशि राजेश डाळ ब.क. ९०८, पोशि सुरज जाधव ब.क. १५८६ चालक पोहवा अखिल इंगळे ब.क. ४६१ यांनी केली आहे.



