“लहान मुलासाठी सावंगी पोलीस आले धावून”
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दि. 14/05/2026 रोजी संध्याकाळी 08.00 वा. जागरूक नागरिक नामे संकेत थुल, रा. सावंगी टी पॉईंट यांनी पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथे एक 4 वर्षे वयाचा लहान मुलगा एकटा रडताना मिळून आल्याने पोलीस स्टेशनला आणून हजर केला व तो हरविला असे सांगितले.
सदरील लहान मुलास सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा ठाणेदार श्री. पंकज वाघोडे यांनी लहान मुलास विश्वासात घेऊन त्यास खाऊ व पिण्याचे पाणी दिले तसेच प्रेमाने विचारपूस केली असता मुलाने त्याचे नाव “ओम” असे सांगितले. त्यावरून ठाणेदार साहेबांनी PSI डोणेकर, पोलीस शिपाई गौरव, NPC प्रियांका घुगरे व HC संजय पटले यांचे विशेष पथक तयार करून मुलास सोबत घेऊन त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचे निर्देश दिले.
सदर पथकाने तत्परतेने परिसरात शोधमोहीम राबवून राजीव नगर, सावंगी मेघे येथे सदर लहान मुलाचे घर शोधून काढले व मुलाची आई सौ. पुनम आकाश दंडारे, रा. राजीव नगर, सावंगी मेघे, ता. जि. वर्धा यांच्या ताब्यात मुलास सुखरूप सुपूर्द केले.
आपला मुलगा सुखरूप परत मिळाल्याने आईने व कुटुंबीयांनी सावंगी मेघे पोलिसांचे आभार व्यक्त केले.
सदर कार्यवाही मा. श्री. सौरभ अग्रवाल, IPS, पोलीस अधिक्षक, वर्धा, मा. श्री. सदाशिव वाघमारे, अपर पोलीस अधिक्षक, वर्धा, मा. श्री. पुंडलिक भटकर, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा विभाग, यांचे मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक पंकज वाघोडे, ठाणेदार, सावंगी पोलीस स्टेशन, PSI डोणेकर, पोलीस शिपाई गौरव, NPC प्रियांका घुगरे व HC संजय पटले सावंगी पोलीस स्टेशन यांनी केली आहे.



