ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राँग साईडने वाहन चालवणाऱ्या चालकाला न्यायालयाची शिक्षा

वाहतुकीस अडथळा व अपघाताचा धोका निर्माण केल्याप्रकरणी ५ हजार दंड : कोर्ट उठेपर्यंत कारावास

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

       शहरातील वाहतूक सुरक्षेला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने राँग साईडने वाहन चालवून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या एका वाहन चालकाला भद्रावती येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने दंड व शिक्षा सुनावली आहे.

प्राप्त माहितीनुसार, दिवाणी व फौजदारी न्यायालय, भद्रावती येथे अपराध क्रमांक ५६६/२०२६ अंतर्गत ही सुनावणी पार पडली. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचे तपास अधिकारी एपीआय धोंगळे हे होते.

या प्रकरणातील आरोपी प्रेमकुमार शेरचंद शामलाल (वय ३८ वर्ष), रा. खेडा, जिल्हा यमुना नगर, हरियाणा याने राँग साईडने वाहन चालवून वाहतुकीस अडथळा निर्माण केला होता. तसेच या कृत्यामुळे गंभीर अपघात अथवा मनुष्यहानी होण्याची शक्यता निर्माण झाली होती.

या प्रकरणावर सुनावणी करताना मा. प्रथम श्रेणी न्यायालय, भद्रावती यांनी आरोपीस दोषी धरत बीएनएसएस कलम २७५ प्रमाणे ₹५,००० रुपयांचा दंड तसेच कोर्ट उठेपर्यंत साधी कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच दंडाची रक्कम न भरल्यास आरोपीस एक महिन्याची साधी कारावासाची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर न्यायालयाने कठोर भूमिका घेतल्याने वाहन चालकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहनही यानिमित्ताने करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये