ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दुर्दम्य आशावाद व प्रचंड जिद्दीच्या योगपटू डॉ.पूजा देऊरकरची आंतरराष्ट्रीय भरारी

३५ ते ४५ वयोगटात भद्रावतीची कन्या करणार भारताच प्रतिनिधित्व

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

 चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील मांगली या गावची लेक वयाच्या पाचव्या वर्षी अस्थमा आजार, पुढे जीवघेणे अपेंडिक्स सर्जरी त्यात पोटाच्या विकाराने नियमित आहार घेणे अशक्य, सलग तीन वर्षापासून जेवणात फक्त लिक्वीड आहार अश्या एक नव्हे तर अनेक आरोग्य व आर्थिक संकटांनी ग्रासलेली तरुणी संकटाना न जुमानता योगा या क्रीडा प्रकारात राष्ट्रीय स्तरावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करण्यास सिद्ध झाली आहे.

प्रसिद्ध योगगुरू रामदेव बाबा आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगासनास विशेष महत्व देत भारतात गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे विविध वयोगटातील आंतरराष्ट्रीय योग स्पर्धा दिनांक . ४ ते ०८ जून पर्यंत आयोजित केल्या आहेत.

या जागतिक स्तरावरील स्पर्धेत एकूण विविध वयोगटातील ७५ देशाचे योगपटू सहभागी होणार आहे.

 यात ३५ ते ४५ वयोगटातून भद्रावतीची लेक डॉ. पूजा उर्फ ज्योती देवराव देऊरकर हि एकमेव तरुणी,भारताचे प्रतिनिधित्व करणार असल्याने भद्रावती कराना हि बाब अभिमानास्पद आहे.

 विशेष म्हणजे प्रथम या जागतिक स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेत्या स्पर्धकांना सहा लाख रुपये रोख व प्रथम श्रेणी अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

 उल्लेखनीय बाब म्हणजे आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तद्वतच पोटाचा विकार त्यामुळे डॉ.पूजा ला कोणताही व्यावसायिक प्रशिक्षक नेमून धडे घेता आले नाही.प्रचंड जिद्द,आवड, आत्मविश्वास या बळावर तिने देशांतर्गत राज्य, राष्ट्रीय, तसेच नेपाळ, थायलंड, मुंबई येथे आयोजित आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्य पूर्वक कामगिरी करीत सुवर्ण पदक पटकावण्याची अखंडित कामगिरी केलेली होती.

मात्र महाराष्ट्र शासनाने आजपावेतो याची दखल न घेतल्याची खंत तिला आहे.मात्र खजील न होता आता चक्क जागतिक स्तरावरील नामांकित व चढाओढ असलेल्या स्पर्धे करीता मोठ्या आत्मविश्वासाने सज्ज झाली आहे. जागतिक स्तरावरील स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून परंपरागत भारतीय योगासनाचा झेंडा आंतरराष्ट्रीय स्तरावर फडकवून देशाचे नाव मोठे करू असा आत्मविश्वास तिने व्यक्त केला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये