ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वर्धा यांची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रक वर धडक कारवाई

स्नेहा मेंढे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वर्धा यांनी ट्रक वाल्यावर 1लाख 31 हजार 500 रुपयांचा दंड ठोठावला

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी वर्ग व कर्मचारी वर्ग यांची मोठी कार्यवाही

धडक कारवाई : विना क्रमांकाच्या रेती ट्रकवर १ लाख ३१ हजार ५०० रुपयांचा दंड वर्धा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पथकाने धडक कारवाई करत MH32AJ6650 या विना क्रमांकाच्या रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकवर मोठी कारवाई केली. सदर ट्रक जप्त करून वाहन चालकाकडून १ लाख ३१ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.ही कारवाई नाचणगाव – विजयगोपाल परिसरात करण्यात आली असून संबंधित वाहन चालकास पुढील कार्यवाहीसाठी RTO वर्धा यांच्या हवाली करण्यात आले आहे.कारवाईदरम्यान प्रफुल्ल मेश्राम सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वर्धा यांच्या मार्गदर्शनाखाली मोटर वाहन निरीक्षक नितीन उके, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक विक्रम काटकपुरे, वाहन चालक धनंजय चावरे चंदन भगत व महेश तायडे तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. नियमांचे उल्लंघन करून अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा परिवहन विभागाकडून देण्यात आला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये