ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गडचांदूर येथे ‘ज्ञान समूहा’चा पाचवा वर्धापनदिन सोहळा उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदूर :_ व्यसनमुक्तीच्या कार्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या ‘अल्कोहोलिक अनॉनिमस’ (AA) अंतर्गत कार्यरत असलेल्या **”ज्ञान समूहा”**चा पाचवा वर्धापनदिन सोहळा सोमवार, ११ मे २०२६ रोजी सावित्रीबाई फुले महाविद्यालय, गडचांदूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. गेल्या पाच वर्षांपासून हा समूह गडचांदूर आणि परिसरातील व्यक्तींना व्यसनमुक्त करून त्यांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश पसरविण्याचे कार्य करत आहे.

या सोहळ्याला गडचांदूरमधील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून समूहाच्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून निलेश ताजने नगराध्यक्ष, नगर परिषद गडचांदूर

श्री. गाडगे मुख्याध्यापक, सावित्रीबाई फुले विद्यालय, गडचांदूर, डॉ. पंकज देरकर,

समाजसेवी धनंजय छाजेड प्रभुती यावेळी उपस्थित होते. या सोहळ्यात समूहाच्या पाच वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेण्यात आला. उपस्थित पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून अल्कोहोलिक अनॉनिमसच्या ‘एक पाऊल व्यसनमुक्तीकडे’ या ध्येयाचे समर्थन केले. नगराध्यक्ष निलेश ताजने यांनी समूहाच्या कार्याला शुभेच्छा देताना, समाजातील अशा उपक्रमांमुळेच निरोगी समाज घडण्यास मदत होते, असे प्रतिपादन केले. व्यसनमुक्तीचा यशस्वी प्रवास ‘ज्ञान समूहा’ च्या माध्यमातून अनेक कुटुंबांना पुन्हा उभारी मिळाली आहे. या वर्धापनदिन सोहळ्याच्या निमित्ताने समूहातील सदस्यांनी आपले अनुभव मांडले, ज्यामुळे उपस्थित नागरिकांना प्रेरणा मिळाली.

“व्यसन सोडा, आयुष्य जोडा” – हा संदेश देत या सोहळ्याची यशस्वी सांगता झाली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये