शहरातील प्रवेशद्वारलगत ट्रॅफिक सिग्नल बसविण्यासाठी काँग्रेससह इतर पक्ष व नागरिकांचा एल्गार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती :_ शहरात वंदनीय बाळासाहेब प्रवेशद्वार समोर नागपूर चंद्रपूर या महामार्गावरील वाहतूक कोंडी व एकच होणारी गर्दी च्या समस्या लक्ष्यात घेता चौकात ट्राफिक सिग्नल लावण्यात यावे या बाबत यापूर्वी शासनास अनेकदा निवेदन देण्यात आले होते.मात्र या समस्येकडे सबंधित विभाग व प्रशासनाने जाणून बुजून दुर्लक्ष केल्याने मागणीला घेऊन नागरिकांच्या वतीने आज दिनांक ११ मे रोजी सायंकाळी सहा वाजता काँग्रेस सह इतर सर्व नागरिकांनी आंदोलन करून आले प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.आंदोलनात विनय अंबागरे ,माजी नगराध्यक्ष सुनील नामोजवार,माजी नगराध्यक्ष सl सरिता सूर ,नगरसेवक अनिल पडोळे, नगरसेवक प्रथम गेडाम,नगरसेविका उषा जाधव, नगरसेविका पल्लवी तामगडे,नगरसेविका सीमा पवार,नगरसेविका कल्पना भुसारी, कल्पना मत्ते अनेक नागरिक युवा वर्ग उपस्थित होते.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून विधायक मार्गाने केलेल्या आंदोलनाची व दिलेल्या निवेदनाची दखल घेत ट्रॅफिक सिग्नल बसवून भद्रावती कराना व महामार्गावरून जाणाऱ्या वाहन व प्रवाश्यांना प्रशासन कितपत न्याय देते हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.



