सुशिक्षित प्रकल्पग्रस्त बेरोजगार संघटनेची बैठक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
बेरोजगार संघटनेचे राज्य अध्यक्ष संजय धनाडे यांच्या नेतृत्वात जिल्हाध्यक्ष राजेश शिरगरे तसेच एडवोकेट नंदकिशोर वानखेडे विनोद. वेरूळकर.यांच्या उपस्थितीत वर्धा येथे नगरपरिषदेच्या श्री अटल बिहारी वाजपेयी सभागृहात सुशिक्षित प्रकल्पग्रस्त बेरोजगार संघटनेची बैठक पार पडली.
सुशिक्षित बेरोजगार प्रकल्पग्रस्ताच्या संदर्भात प्रलंबित असलेल्या मागण्यांच्या अनुषंगाने या समस्या तात्काळ पद्धतीने शासकीय पातळीवर निकाली काढण्याच्या संदर्भात ही बैठक पार पडली. त्यामध्ये प्रकल्पग्रस्त बेरोजगार संघटनेमार्फत नागपूर हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली बाजू वकील लतीश कोठारी यांनी मांडलि होती. त्याचा मा. उच्च न्यायालय नागपूर ने दिलासा देणारा आदेश प्रकल्पग्रस्तांना नोकरी किंवा अनुदान स्वरूपात मदत द्या त्याबाबत वन व महसूल विभागाला यांना बारा आठवड्याचे आत निर्णय घेण्याबाबत निर्देशित केले होते. परंतु कालावधी लोटून सुद्धा शासकीय पातळीवर कुठलीही हायकोर्टाच्या आदेशाच्या निमित्याने अंमलबजावणी केलेली नाही. व जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत उडवा उडवी ची उत्तरे देऊन प्रकल्पग्रस्त बेरोजगारांची दिशाभूल करण्यात आली. जेव्हा की ही.शासकीय पातळीवरच्या धोरणेणिक बाबी असल्याने शासनाने या संदर्भात एखादे धोरण ठरवणे आवश्यक होते. परंतु गेल्या वीस ते 25वर्षापासून प्रकल्पग्रस्तांची बोळवण करणाऱ्या शासनाने कोर्टाच्या आदेशानंतर सुद्धा कुठलीही सक्रिय सकारात्मक कृती न करता विषय थंड बसत्यात ठेवलेला होता. त्या अनुषंगाने कोर्टाचा आदेशाची अवमानना शासनामार्फत करण्यात आली याबाबतची अवमानना याचीका टाकण्यासंदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आली. मीटिंगमध्ये शेतकरी प्रकल्पग्रस्त नागरिकांकरिता कलम 28 चा विषय मोठ्या प्रमाणात घेण्यात आला होता. त्यामध्ये प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवांना अनुदानाची कायदेशीर तरतूद केल्याने हा विषय सुद्धा प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवांच्या लक्षात आणून देण्यात आला याकरता एक मोठी मोहीम बेरोजगार संघटनेच्या माध्यमातून राबविल्या जाणार आहे याबाबतचे प्रस्ताव भूसंपादन अधिकाऱ्याकडे प्रस्तावित करण्यात येणार आहे.व प्रकल्पग्रस्तांना यानिमित्ताने एक मोठा आर्थिक आधार मिळवून देण्याकरता संघटनेमार्फत युद्ध पातळीवर प्रयत्न केल्या जाणार याबाबतची चर्चा केली. यासंदर्भात मीटिंग माननीय महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे महाराष्ट्र राज्य त्यांच्यासोबत लावण्याची बेरोजगार संघटनेचे राज्य अध्यक्ष मार्फत ठरलेले आहे .या बैठकीला संघटनेचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
त्यामध्ये मनिशा सुरस्कार .निकिता शेंडे. सचिन दहाट .शेखर जामूनकर .दिनेश डेहणे .रवींद्र खंडारे .पांडुरंग मलिये. गजानन बारापात्रे .शेख मोहसीन .शेख कदिर .डॉ. दुर्वास पानसे . सुधाकर डेहणे. राहुल काळे.वाल्मीक पांडे.उमाकांत आडकिने. शैलेश तलवारे.सुधाकर भोंगरे.भिमराव पावडे.संदिप उरकुडे.बंडु आडकिने.सुरज माते. सुनिल काळे.गौतम काळे .सुशिल पाटील .वसंत मंडवे.प्रशांत हेरोडे.देवानंद खंडारे.अतुल डहाके.सचिन तिडके.तसेच बोरधरण प्रकल्प ग्रस्त संघटक शंकर पानबुडे ज्ञानेश्वर कोडापे सदस्य दिलीप मेश्राम संजय बोन्द्रे ज्ञानेश्वर मेश्राम. इत्यादी प्रकल्प ग्रस्त उपस्थित होते उपस्थित…



