सेलू येथे लवकरच स्वतंत्र उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय सुरू होणार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा जिल्ह्यातील सेलू येथे स्वतंत्र उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) कार्यालय स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला असून, राज्याचे गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या पुढाकारातून हा महत्त्वपूर्ण निर्णय आकार घेत आहे.
यासंदर्भात नुकतीच पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीत सेलू येथे स्वतंत्र उपविभागीय कार्यालय सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या निर्णयामुळे सेलू परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत मिळणार आहे.
सध्या वर्धा जिल्ह्यातील पोलीस प्रशासनावर वाढता ताण असून, नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने स्वतंत्र कार्यालयाची आवश्यकता व्यक्त केली जात होती. नवीन कार्यालय सुरू झाल्यानंतर सेलू, सेवाग्राम, सिंदी रेल्वे तसेच परिसरातील पोलीस ठाण्यांचे कामकाज अधिक गतिमान होणार आहे.
गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा अधिक सक्षम व कार्यक्षम करण्यासाठी विशेष लक्ष दिले असून, नागरिकांना जलद व प्रभावी पोलीस सेवा मिळावी हा यामागील उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.
या प्रस्तावामुळे सेलू तालुक्यातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात असून, लवकरच कार्यालय प्रत्यक्षात सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आह..



