वाहतूक पोलीस अंमलदार यांना सुरक्षे करिता मिळाले बॉडी वोर्म केमेरे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा शहरात अपघाताचे प्रमाणात वाढ झालेली आहे अपघात कमी करणेसाठी मा पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल सर यांनी वाहतूक अंमलदार यांनी वर्धा शहरात व जिल्ह्यात अपघात संख्या कमी करावे, अति वेगlणे वाहन चालवीणारे चालक. दारू पिवून वाहन चालवीणारे चालक यांच्यावर कार्यवाही करण्याचे आदेश दिलेत तसेच जे चालक मोटार वाहन कायद्याचे उल्लंघणं करतील त्यांचे फोटोज, व्हिडीओ काढणे करिता वाहतूक पोलिसांना चलणं करताना पुरावा म्हणून सुद्धा या केमेराचा उपयोग होनार आहे.
सदर बॉडीवोर्म केमरा हा वाहतूक ड्युटीवर नेमलेले अंमलदार आपले गनवेशवर लावतील व त्यात फोटो व अडिवो व व्हिडीओ ही काढतील जे चालक दारू पिवून गाडी चालवतात त्यांच्या गाडीचे ही अडीओ व्हिडीओ शूटिंग यामध्ये करता येणार आहे, तसेच जे चालक चालणं केल्यावर वादविवाद करतात त्यां घटनांचीही अडिवो व्हिडीओ शूटिंग यात होणार असल्यामुळे वाहतूक अंमलदार यांच्या सुरक्षेकरिता ही या बॉडीवोर्म केमेराचा उपयोग हा होणार आहे, या शासकीय बॉडीवोर्म केमेरा मधील फोटोग्राफी, अडिओ ग्राफी व व्हिडीओ ग्राफी मध्ये कोणालाही एडिटिंग वा डिलीट करता येणार नाही आहे, वाहतूक अंमलदार यानि आपले चालणं कार्यवाही ही योग्य रीतीने योग्य पुराव्या सह केली कि नाही यावर वरिष्ठ अधिकारी यांचे लक्ष राहणार आहे, वाहन चालक यांनाही यामुळे न्याय मिळणेस सहकार्य होणार आहे, सदर बॉडीवोर्म केमेरे हे मा पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल यांनी वर्धा जिल्ह्यातील सर्व वाहतूक अंमलदार यांना दिलेले आहे.
तरी वाहन चालक यांनी वाहतूक नियमांचे पालन करावे सुरक्षित प्रवास करावे अपघात होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावे असे आवाहन वाहतूक पोलिसांनी चालकांना केलेले आहे.
पो. नि. वाहतूक शाखा वर्धा



