ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
पोंभुर्णा येथे मका खरेदी केंद्र सुरू
मका खरेदी केंद्र सुरू करून दिल्याबद्दल आदरणीय आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे मनःपूर्वक आभार

चांदा ब्लास्ट
पोंभुर्णा : मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांसाठी मका खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असून यामुळे शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मका विक्रीसाठी शेतकऱ्यांना होत असलेला त्रास लक्षात घेऊन मा. सुधीरभाऊ यांनी शासन स्तरावर प्रभावी पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने आता शेतकऱ्यांना आपल्या परिसरातच मका विक्रीची सुविधा उपलब्ध झाली आहे.
या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा वेळ, पैसा व श्रम वाचणार असून योग्य दरात मका विक्री होण्यास मदत होणार आहे. शेतकरी हितासाठी सदैव तत्पर असलेल्या मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे हरीश ढवस, तालुका अध्यक्ष भाजपा पोंभुर्णा, सर्व भाजपा पदाधिकारी तसेच सर्व शेतकरी बांधवांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.



