मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत पाटण गावाची तपासणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- तालुक्यातील ग्राम पंचायत पाटण व पंचायत समिती जिवती अंतर्गत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामध्ये सहभागी असलेल्या गावांना जिल्हा परिषद नांदेड पंचायत समिती नायगाव खैरे येथील तालुका स्तरीय समितीने भेट देऊन तपासणी व मुल्यांकन केले.
ग्राम पंचायत पाटण येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत केलेल्या कामाची अभिलेख दस्तावेजांची पडताळणी व त्याचबरोबर अभियान कालावधीत झालेली कामे तपासणी यामध्ये अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा, आरोग्य केंद्र, व्यायाम शाळा, सार्वजनिक शोषखड्डा, गांडूळ खत डेमो,घन कचरा, सांडपाणी व्यवस्थापन, वाचनालय, गावातील सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता, त्याचबरोबर इतरही नाविन्यपूर्ण राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची सखोल तपासणी करून याबाबत मुल्यांकन केले.
सदरची तपासणी जिल्हा परिषद नांदेड पंचायत समिती नायगाव खैरे प्रवीणकुमार वाणखडे गट विकास अधिकारी, प्रकाश जाधव विस्तार अधिकारी ग्राम पंचायत, गणेश टोणगे विस्तार अधिकारी ग्राम पंचायत, गौतम चिंतोरे, मुश्ताक शेख,व तपासणी चमु सोबत पंचायत समिती जिवती चे गट विकास अधिकारी संजय नैताम, आरोग्य विस्तार अधिकारी बांबोळे, ग्राम पंचायत पाटण चे सरपंच सिताराम मडावी, ग्राम पंचायत अधिकारी श्रीहरी केंद्रे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर ग्राम पंचायत कर्मचारी उपस्थित होते.



